बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर

बेनेली इम्पीरिअल 400 ची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ (Benelli Imperiale 400 launch) दिसत आहे. ही बाईक लाँच झाल्यापासून आतापर्यंत ही बाईक 700 लोकांनी बुक केली आहे.

बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर

मुंबई : बेनेली इम्पीरिअल 400 ची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ (Benelli Imperiale 400 launch) दिसत आहे. ही बाईक लाँच झाल्यापासून आतापर्यंत 700 लोकांनी बुक केली आहे. इम्पीरिअल 400 ला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि जावा बाईकचा सर्वात मोठा स्पर्धक समजले जात आहे. बेनेलीने ही बाईक भारतात 1.69 लाख रुपयामध्ये लाँच (Benelli Imperiale 400 launch) केली आहे.

डीलरशिपकडे लोकांची गर्दी

बेनेली बाईक Royal Enfield Classic 350 (1.54 लाख) पेक्षा 15 हजार रुपयांनी आणि Jawa Forty Two पेक्षा 14 हजार रुपयांनी महाग आहे. असे असतानाही बेनेली विकत घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात डिलरशिपकडे गर्दी करत आहेत. कार ब्लॉग इंडियानुसार, सर्व डिलरशिपकडे बनेली इम्पीरिअल 400 बाईक पोहचली आहे.

बेनेली इम्पीरिअल 400 साठी ग्राहक चार हजार रुपये देऊन बुकिंग करत आहे. बुकिंगसाठी तुम्ही डीलरशिकडे जाऊ शकता. त्यासोबतच कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरही जाऊ शकता.

फीचर

Imperiale 400 मध्ये 374cc फ्यूल-इंजेक्टेड, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन दिला आहे. हे इंजिन 5,500rpm वर 21bhp पॉवर आणि 4,500rpm वर 29Nm चे टॉर्क जनरेट करते. यामध्ये फाईव्ह-स्पीड गिअरबॉक्ससह पुढे आणि मागे 300mm आणि 240mm चा डिस्कब्रेक सेटअप दिला आहे. बाईकमध्ये अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच एबीएसही दिले आहे.

कंपनीकडून बाईकवर तीन वर्षाची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी आणि पहिल्या दोन वर्षासाठी कॉम्प्सीमेंट्री सर्व्हिस पॅकेजही दिले जात आहे. Imperiale 400 तीन रंगात ( सिल्वर, रेड आणि ब्लॅक) उपलब्ध आहे. यामध्ये जर तुम्ही रेड आणि ब्लॅक रंगात बाईक घेतली. तर तुम्हाला 10 हजार अधिक भरावे लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *