AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत कोल्हापुरात वृद्धाचा मृत्यू? घटनेनं खळबळ

कोल्हापुरातल्या लकिकट्टे गावातील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी एका वृद्धाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला असून काही दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

गावकऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत कोल्हापुरात वृद्धाचा मृत्यू? घटनेनं खळबळ
कोल्हापुरातल्या लकिकट्टे गावातील घटनाImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 08, 2026 | 11:36 AM
Share

कोल्हापुरतल्या लकिकट्टे गावात एका वयस्कर व्यक्तीला अमानुष पद्धतीने बांधून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीला बांधून नेलं त्याचा नंतर झाला मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी नेसरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचं कारण अद्याप प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या लकीकट्टे गावात एका वयस्कर व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

3 फेब्रुवारी रोजी लकिकट्टे गावाशेजारी एका वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नेसरी पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित वयस्कर व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यातूनच त्यांनी गेल्या काही दिवसात गावातील अनेक गवतांच्या गंजींना आग लावली होती. या घटनेमुळे गावकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं तर काहींच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. गंजीला आग लावण्याच्या रागातूनच अनेकदा गावकऱ्यांनी संबंधित मनोरुग्णाला मारहाणदेखील केली होती.

मृत्यूच्या दोन दिवस आधीदेखील असाच प्रकार घडला होता. गवताच्या गंजीला पुन्हा आग लागल्याने गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीमुळेच मानसिक स्थिती ठीक नसलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला का अशीदेखील चर्चा सुरू आहे. दोन ते तीन दिवस गावातील माळरानावर जेवण आणि पाणी न मिळाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीला अमानुष मारहाण झाल्याची दबक्या आवाजात चर्चा असली तरी साक्षीदार नसल्याने मारहाणीचे पुरावे मिळाले नसल्याचं मत पोलिसांनी नोंदवलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालातून व्यक्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल आणि त्यानंतर पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...