सनरूफ
Image Credit source: Social Media
मुंबई : सनरूफ हे आजकाल कारमध्ये अतिशय लोकप्रिय वैशिष्ट्य बनले आहे. त्यामुळे कार अधिक स्टायलिश दिसते. पण, काही लोकं सनरूफचा गैरवापर करतात. वास्तविक, त्यांनी सनरूफचा वापर कसा करायचा हेही माहिती नसते. अनेकजण सनरूफमधे (Sunroof Use) उभे राहून मजा घेतात, जे धोकादायक ठरू शकते. कारमध्ये सनरूफचा योग्य वापर काय आहे आणि कंपनीने हे फिचर कशासाठी दिले आहे ते जाणून घेऊया.
कारमध्ये सनरूफचा योग्य वापर?
- सनरूफ असण्याचा पहिला फायदा म्हणजे तो कारच्या आत अधिक नैसर्गिक प्रकाश देतो. नैसर्गिक प्रकाशाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की मूड सुधारणे आणि ऊर्जा पातळी राखणे.
- सनरूफ उघडून तुम्ही कारमध्ये ताजी हवा आत घेऊ शकता. सनरूफच्या मदतीने कार लवकर थंड करता येते. विशेषतः उन्हाळ्यात, सनरूफ उघडून, आतली गरम हवा बाहेर काढून कार केबिन थंड करू शकता.
- कारमध्ये सनरूफ असल्यास तुम्हाला एक ओपन फील येतो. यामुळे तुम्हाला कारच्या केबिनमध्ये अधिक प्रशस्त वाटते. सनरूफ उघडल्याने कारचे वेंटिलेशन सुधारते.
- सनरूफ कारला अधिक स्टायलिश बनवते. हे कारला अधिक आकर्षक आणि स्पोर्टी लुक देते. त्यामुळे आजकाल याला खूप मागणी आहे.
ही चूक कधीही करू नका
अनेकदा तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना सनरूफमधून बाहेर पडून मजा करताना पाहिलं असेल, जे चुकीचं आहे. असे करू नये कारण अशी मजा धोकादायक ठरू शकते. मुलांनी कितीही आग्रह केला तरी त्यांना सनरूफमधून बाहेर पडू देऊ नका कारण हार्ड ब्रेकिंग करताना सनरूफमधून बाहेर पडणारी व्यक्तीही गाडीतून पडू शकते. असा अपघात जीवघेणाही ठरू शकतो.