AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyrus Mistry Accident : मर्सिडीजमध्ये 7 एअरबॅग असूनही का नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव? जाणून घ्या, नेमकं काय घडलं!

दोन पेक्षा जास्त एअरबॅग असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्नही उपस्थित होतोय. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर प्रामुख्याने उपस्थित झालेले पाच प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं नेमकं काय सूचित करतायत, हे जाणून घेऊयात.

Cyrus Mistry Accident : मर्सिडीजमध्ये 7 एअरबॅग असूनही का नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव? जाणून घ्या, नेमकं काय घडलं!
अपघातग्रस्त मर्सिडीजImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 05, 2022 | 7:34 AM
Share

मुंबई : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mystry) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्झरी गाड्यांची (Luxury Cars in India) सुरक्षा, त्यांचा वेग आणि इतर बाबी आता केंद्रस्थानी आल्यात. त्यामुळे मर्सिडीजसारख्या लक्झरी गाड्या सुरक्षित आहेत का? दोन पेक्षा जास्त एअरबॅग (Airbag) असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्नही उपस्थित होतोय. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर प्रामुख्याने उपस्थित झालेले पाच प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं नेमकं काय सूचित करतायत, हे जाणून घेऊयात.

प्रश्न क्र. 01

मर्सिडीज कारमध्ये सात एअरबॅग, पण तरी का नाही वाला सायरस मिस्त्री यांचा जीव?

कार अपघातात एअरबॅग महत्त्वाची भूमिका बजावतात. एअरबॅगमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांचा जीव वाचल्याच्या घटना समोर आल्यात. अशात मर्सिडीजमध्ये सात एअरबॅग असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पण एअरबॅगलाही मर्यादा आहेत. कार अपघातात एखादी व्यक्ती गाडीच्या बाहेर फेकली गेली, तर एअरबॅगचा उपयोग शून्य असतो. सायरस मिस्त्री कार अपघातात झालेली धडक इतकी भीषण होती, की ड्रायव्हरला ब्रेक लावण्याचाही वेळ मिळाला की नाही, यावरुन शंका घेतली जातेय.

कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेला होता. पण कार अपघाताचा इम्पॅक्ट इतका जबर होता की प्रवाशांना इंटरनर इंज्युरी झाली असावी, अशी शंका घेतली जातेय. प्रथमदर्शनी पाहणीत, ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाचं डोकं विंडस्क्रीनला लागल्याची शंका घेतली जातेय. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल.

पोलिसांनी काय म्हटलं?

प्रश्न क्र. 02

अपघातानंतर एअरबॅग बाहेर आले, तर त्याने गुदमरुन जायला होतं?

नाही. एअरबॅगमध्ये श्वास कोंडला जातो का किंवा गुदमरायला होतं का, अशी शंका कुणालाही येऊ शकते. पण असं होत नाही. एअरबॅग एका फुग्यासारखं काम करते. एअरबॅगमध्ये इनहर्ट गॅस असतो. याने कोणतंही नुकसान होतं नाही. अपघातात प्रवशांना डॅशबोर्ड किंवा बाजूला धडक बसण्यापासून रोखण्याचं काम एअरबॅग करते आणि प्रवाशाला पुन्हा सीटच्या दिशेने ढकलते, असं जाणकार सांगतात.

प्रश्न क्र. 03

भारतात लक्झरी गाड्यांना किती वेगमर्यादा आहे?

भारतात हायवे आणि एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचा वेग किती असावा, याच्या मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या जर्मनी किंवा इतर देशात ताशी 300 किलोमीटरच्या सुसाट वेगाने धावतात. पण भारतात यांची वेगमर्यादा ताशी 240 किमी इतकी आहे. वाहतुकीच्या घालून देण्यात आलेल्या नियमांनुसार यापेक्षा जास्त वेगानं या गाड्या भारतात नाही चालवल्या जाऊ शकत.

प्रशन क्र. 04

अपघाताचं प्रमुख कारण काय?

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचं प्रमुख कारण काय, याचा तपास केला जातोय. पण सध्यातरी अतिवेगामुळे हा अपघात घडला असावा, अशी शंका घेतली जातेय. सायरस मिस्त्री यांची कार 125 ते 150 च्या स्पीडने जात असावी. याच वेळी गाडी रस्त्यावर स्कीड झाल्यामुळे किंवा कुणालातरी वाचवण्याच्या नादात अथवा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

आता अपघाताच्या ठिकाणी काही मृतदेह गाडीच्या बाहेर आढळून आलेत. त्यामुळे हे लोक गाडीच्या बाहेर फेकले गेले, स्वतःहून जखमी अवस्थेत बाहेर पडले आणि मग गाडीबाहेर त्यांचा मृत्यू झाला का, या बाबी तपासानंतर स्पष्ट होतील. शिवाय ज्या सुरक्षा भिंतीला गाडीने धडक दिली, तिला फारसा मार बसला नाही. मात्र कारचं मोठं नुकसान झालं होतं. या गोष्टी नेमकं काय सूचित करतात, हेदेखील तपासानंतरच स्पष्ट होईल.

प्रश्न क्र. 05

मर्सिडीज कार किती सुरक्षित?

मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार अतिशय सुरक्षित मानल्या जातात. पण या गाड्यांना कुणी धडक दिली किंवा या गाड्या एखाद्या ठिकाणी धडकल्या, तर त्यांना काहीच होणार नाही, असं मानणंही चूक ठरेल. कोणत्याही धडकेत गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांवर त्यांचा परिणाम हा होतोच. धडक किती जोरात झाली, कोणत्या एन्गलमध्ये झाली, या सगळ्या गोष्टींवरही अनेक बाबी अवलंबून असतात, असं जाणकार सांगतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.