
भारतीय ऑटो क्षेत्रात जबरदस्त हालचाल दिसत आहे. जीएसटी 2.0 रिफॉर्म्समुळे या क्षेत्रात मोठा बदल दिसत आहे. कर कपातीचा फायदा नवीन वाहन खरेदीदारांना होत आहे. कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. ऑल्टो के 10 ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. पण या कारने तिचा हा रेकॉर्ड मोडला आहे. आता ऑल्टो के 10 पेक्षा पण मारुती सुझुकीची दुसरी कार स्वस्त झाली आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्स सारखं सेफ्टी फीचर्स नाहीत हाच एक बदल आहे.
S-Presso सर्वात स्वस्त कार
जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर मारुतीने आपल्या अनेक छोट्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. या यादीत S-Presso सर्वात स्वस्त कार ठरली आहे. या कारची किंमत घसरून केवळ 3.50 लाख रुपये इतकी आहे. तर ऑल्टो K10 ची सुरुवातीची किंमत आता 3.70 लाख रुपयांपासून सुरू होती. म्हणजे जी कार गेल्या एका दशकापासून भारतातील सर्वात स्वस्त कार म्हटल्या जात होती. आता ती S-Presso पेक्षा महाग ठरली आहे.
किंमत कमी होण्याचे कारण काय?
किंमत कमी होण्यामागे एक प्रमुख कारण आहे सेफ्टी फीचर्स. सरकारने नवीन कारमध्ये 6 एअरबॅग्सचे स्टॅंडर्ड नियम लागू केले आहे. मारूतीने Alto K10 आणि Celerio कार या अपडेटसह बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे एस प्रेसोची किंमत कमी झाली आहे. कारय़ण या कारमध्ये केवळ 2 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे किंमत कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना कमी किंमतीत कार हवी आहे. त्यांच्यासाठी ही कार आकर्षक डील ठरू शकते.
GST 2.0 चा मोठा परिणाम
पहिल्यांदा छोट्या पेट्रोल कारवर टॅक्स स्लॅब 10 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. पूर्वी जिथे 28 टक्क्यांचा कर द्यावा लागत होता. तिथे तो आता घसरून 18 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर सरकारने सेस पण कमी केला आहे. त्याचा थेट परिणाम ऑन-रोड कारवर झाला आहे. त्यामुळे हॅचबॅक कार स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे बजेट फ्रेंडली कार खरेदीदारांना दिवाळीपूर्वी कार खरेदीची संधी चालून आली आहे.