AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kawasaki Ninja 300 : ही धाकड बाईक एकदम स्वस्त; GST कपातीनंतर आता दामटा सुसाट, किंमत तरी काय?

Kawasaki Ninja 300 Price : कावासाकी इंडियाने GST 2.0 लागू झाल्यानंतर तरुणाईत लोकप्रिय ठरलेल्या 350cc पर्यंतच्या बाईक स्वस्त केल्या आहेत. त्यामुळे कावासाकी निन्जा 300 या बाईकची किंमत कमी झाली आहे. आता किती आहे किंमत या बाईकची?

Kawasaki Ninja 300 : ही धाकड बाईक एकदम स्वस्त; GST कपातीनंतर आता दामटा सुसाट, किंमत तरी काय?
किती स्वस्त झाली बाईक
| Updated on: Sep 23, 2025 | 4:20 PM
Share

जपानची बाईक उत्पादक Kawasaki India ने 22 सप्टेंबर 2025 रोजीपासून आपली एंट्री लेव्हल आणि मिड रेंज बाईक्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कावासाकी इंडियाने GST 2.0 लागू झाल्यानंतर तरुणाईत लोकप्रिय ठरलेल्या 350cc पर्यंतच्या बाईक स्वस्त केल्या आहेत. नवीन दरामुळे या कावासाकी मोटरसायकलच्या किंमतीत हजार ते 68 हजार रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. Ninja 300, W175 आणि KLX230 सारखी मॉडल स्वस्त झाली आहेत. पण 350cc वरील बाईक्स महागल्या आहेत. कावासाकी निन्जा 300 या बाईकची किंमत कमी झाली आहे. आता किती आहे किंमत या बाईकची?

एंट्री लेव्हल आणि मिड रेंज बाईक्सवर मोठी बचत

  • कावासाकीने दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनीची सर्वात लोकप्रिय बाईक Ninja 300, W175, KLX230 आणि Versys-X 300 च्या किंमती पूर्वीपेक्षा कमी झाल्या आहेत.
  • Ninja 300 (MY25) आता 3.17 लाख रुपयांना मिळेल. या बाईकवर 26,000 रुपयांची बचत झाली आहे.
  • W175 (MY24) मॉडलवर 10,000 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. ऑफ-रोड सीरीजमधील KLX230 (MY25) आता 3.30 लाख रुपयांऐवजी 2.99 लाख रुपयांना मिळेल.
  • KX250 (MY25) सर्वाधिक 68,000 रुपयांनी स्वस्त मिळेल. या बाईकची नवीन किंमत 7.79 लाख रुपये इतकी आहे.

छोट्या इंजिन बाईक स्वस्त

350cc हून कमी इंजिन असलेल्या बाईकच्या किंमती उतरल्या आहेत. तर 350cc वरील मॉडेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन Ninja 500 (MY25) आता 5.66 लाख रुपयांपासून सुरू होईल. तर टॉप एंड मॉडल Ninja H2 SX SE (MY25) ची किंमत 36.28 लाख रुपयांपर्यंत पोहचेल. या श्रेणीतील बाईकवर कंपनीने 2.34 लाख रुपयांपर्यंतचे ओझे टाकले आहे.

ग्राहकांना फायदा, डिलर्सचे मत काय?

आता एक महिना सणावारांचा असेल. दसरा, दिवाळीत मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे छोट्या इंजिन बाईकच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर मोठ्या इंजिन असलेल्या बाईक महागल्याने त्याचा विक्रीवर नकारात्मक परिणाम दिसेल. डीलर्सच्या मते येत्या दोन महिन्यात ग्राहकांच्या उड्या पडतील. GST 2.0 मुळे एंट्री लेव्हल बाईक अधिक किफायत दरात उपलब्ध होतील. फेस्टिव्ह ऑफर्सचा फायदा पण ग्राहकांना मिळेल. त्यामुळे एक दमदार बाईक खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना मोठा फायदा होईल.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....