AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेटल बॉडीवाली Ather Konarc ई-स्कूटर लाँच, २०० किमीची रेंज, किंमत किती ?

एथर कंपनीने आपली पहिली मेटल बॉडीवाली ई-स्कूटर लाँच केली असून हीचे नाव Ather KONARC असे आहे. यात अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहे.

मेटल बॉडीवाली Ather Konarc ई-स्कूटर लाँच, २०० किमीची रेंज, किंमत  किती ?
Ather Konarc
| Updated on: Aug 29, 2026 | 4:41 PM
Share

एथर एनर्जीने तिच्या बहुचर्चित कोणार्क ( Ather KONARC ) स्कूटराला लाँच केले आहे. ही स्कूटर एथर ईएल प्लॅटफॉर्मवर आधारीत आहे. या स्कूटरला कंपनीने मेटल बॉडी आणि मल्टीपल नव्या फिचर्समध्ये लाँच केले आहे. ही स्कूटर स्मार्ट रिमोट सोबत उपलब्ध झाली आहे. कोणार्क एथरमध्ये कंपनीने अनेक फिचर्स दिले आहेत.

एथर कोणार्कला कंपनीने सुमारे एक लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. याची डिलिव्हरी २१ सप्टेंबर पासून एस-लाईनपासून सुरु होणार आहे. ही स्कूटर एस लाईन आणि झी-लाईन मध्ये लाँच झाली आहे. एस-लाईनमध्ये चार व्हेरिएंट्स असणार आहेत. तर झी – लाईनमध्ये दोन स्कूटर्स मिळणार आहेत. सध्या एथरचे सर्व व्हेरिएंट्स उपलब्ध नाहीत.

एथर कोणार्क एसच्या १०० किमी रेंजच्या व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे. तर १२५ किमी व्हेरिएंट्सची किंमत १, २१,००० रुपये आहे. आणि १६१ किमी रेंजच्या व्हेरिएंटची किंमत १,४४,९९९ रुपये एक्स शोरुम आहे. अन्य तीन व्हेरिएट्सच्या किंमती कंपनीने अजून जाहीर केलेली नाही.

केव्हा होणार डिलिव्हरी?

एस सिरीजमध्ये चार पर्याय मिळणार आहेत. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये १०० किमी रेंज मिळणार आहे. या स्कूटरची डिलिव्हरी पुढच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत होणार आहे. तर १२५ किमी आणि १६१ किमी रेंज वाल्या एस-लाईन स्कूटर्सची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. २०० किमी रेंजची स्कूटर पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत येणार आहे. तर झी-सिरीज २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत मिळणार आहे.

स्कूटरची खासियत काय?

कोणार्क एथर ही मेटल बॉडी असलेली एथरची पहिली स्कूटर आहे. यात कंपनीने अनेक स्मार्ट फिचर्स दिलेले आहे. ही स्कूटर स्मार्ट की सोबत येते. एस-लाईनमध्ये २०० किमीची रेंज मिळणार आहे. या स्कूटरची टॉप स्पीड ७० Kmph असणार आहे. यात चार कलरचे ऑप्शन असणार आहेत. तर झी-लाईनमध्ये या रेंज मध्ये आयडीसी क्लेम्ड रेंज १६१ किमी आहे. याची टॉप स्पीड ८० किमी प्रति तास असणार असून ५ कलर ऑप्शनमध्ये ती उपलब्ध असणार आहे.

एंट्री लेव्हल एथर कोणार्क मध्ये २.१ kWh बॅटरी मिळते. तर मध्यम व्हेरिएंटमध्ये २.७ kWh ची बॅटरी मिळते. टॉप व्हेरिएंटमध्ये ३.५ kWh दिलेली आहे. ही स्कूटर युनिबॉडी चेसिससह मिळते. यात ऑटोहोल्ड, फॉल सेफ, एअरवॉक, ब्ल्यूटूथ कॉल आणि म्यूझिक अलर्ट सारखे फिचर्स मिळतात. या एथर कनेक्टेड. थेफ्ट आणि टो अलर्ट, फाईंड माय स्कूटर आणि ओटीए अपडेट्स सारखे फिचर्स मिळतता. कोणार्कमध्ये ३१ लिटरची अंडरसीट स्टोरेज आणि युएसबी टाईप सी – चार्जर मिळतो.

या स्कूटरमध्ये टीएफटी इंस्ट्रुमेंट कंसोल असून त्यात स्मार्टफोन कनेक्टिव्ही मिळते. कोणार्कमध्ये व्हॉईस कंट्रोल, फुल फ्लेजेड नेव्हीगेशन, पॉटहॉल अलर्ट आणि क्रॅश अलर्ट सारखे फिचर्स आहेत. यात की लेस इग्निशन, की लेस बुट रिलीज आणि हिल – होल्ड असिस्ट सारखी सुविधा मिळते.

Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप