AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार खरेदीचा सुवर्णयोग! टाटा, मारुती आणि किआवर जोरदार ऑफर, होईल ₹३.२५ लाखांपर्यंत बचत

ऑगस्ट २०२६ मध्ये टाटा, मारुती, हुंडाई, किआ आणि होंडाच्या कारवर अनेक ऑफर मिळत आहेत. कॅश डिस्काउंट, एक्सचेंज आणि स्क्रॅपेज फायद्यांमुळे पात्र ग्राहकांना हजारो ते लाखो रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

कार खरेदीचा सुवर्णयोग! टाटा, मारुती आणि किआवर जोरदार ऑफर, होईल ₹३.२५ लाखांपर्यंत बचत
maruti tata kiaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 12:42 PM
Share

जर तुम्ही ऑगस्ट २०२६ मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्यात अनेक मोठ्या कार कंपन्या आपल्या गाड्यांवर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट आणि लॉयल्टी ऑफर समाविष्ट आहेत. काही कारांवर सर्व ऑफर एकत्र केल्यास लाखो रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. मात्र, तुम्हाला किती फायदा मिळेल, हे कारच्या मॉडेल, डीलर आणि ऑफरच्या अटींवर अवलंबून असेल. म्हणून कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या डीलरकडून संपूर्ण माहिती नक्की घ्या.

टाटा हॅरियर ईव्हीवर ३.२५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा

टाटा मोटर्सकडून ऑगस्टमध्ये सर्वात मोठी ऑफर हॅरियर ईव्हीवर देण्यात येत आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर १ लाख रुपयांपर्यंतची फ्रीडम सेलिब्रेशन ऑफर मिळत आहे. याशिवाय ५० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज फायदा आणि ७५ हजार रुपयांपर्यंत स्क्रॅपेज डिस्काउंटही मिळू शकतो. जर ग्राहक आधीपासून टाटा ईव्ही वापरत असेल, तर त्याला १ लाख रुपयांपर्यंत लॉयल्टी फायदा मिळू शकतो. तर टाटाच्या पेट्रोल किंवा डिझेल कार असलेल्या ग्राहकांना ५० हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बेनिफिट मिळू शकतो. सर्व अटी पूर्ण झाल्यास काही ग्राहकांना एकूण ३.२५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

मारुती ग्रँड विटारांवरही मोठी ऑफर

मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिडवरही ऑगस्टमध्ये अनेक फायदे मिळत आहेत. यात १.८५ लाख रुपयांपर्यंत रोड टॅक्स बेनिफिट आणि ५ वर्षांची वॉरंटी समाविष्ट आहे. याशिवाय ३० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, ४५ हजार रुपयांपर्यंत स्क्रॅपेज बोनस आणि काही जुन्या कारांवर ३० हजार रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस मिळू शकतो. कॉर्पोरेट ग्राहकांना १० हजार रुपयांचा अतिरिक्त फायदाही मिळू शकतो. याशिवाय बोलेनो आणि वॅगेनार यांसारख्या इतर मॉडेल्सवरही ऑफर देण्यात येत आहेत.

हुंडाई क्रेटावर १ लाख रुपयांपर्यंत बचत

हुंडईच्या क्रेटा खरेदी करणाऱ्यांनाही ऑगस्टमध्ये फायदा मिळू शकतो. या एसयूव्हीवर ५० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि ५० हजार रुपयांपर्यंत स्क्रॅपेज बेनिफिट देण्यात येत आहे. म्हणजे एकूण फायदा १ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो. क्रेटा इलेक्ट्रिकवर १५ हजार रुपये कॅश आणि ३५ हजार रुपयांपर्यंत स्क्रॅपेज फायदा मिळू शकतो. कंपनीच्या वर्नावरही कॅश आणि स्क्रॅपेज किंवा एक्सचेंज बेनिफिट उपलब्ध आहे. व्हेन्यू आणि व्हेन्यू एन लाईनवर ५ हजार रुपयांपर्यंत स्क्रॅपेज बोनस देण्यात येत आहे.

किआ सोनेट आणि सायरॉसवरही ऑफर

किआच्या सोनेटवर वेगवेगळे फायदे एकत्र करून ६० हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. तर सायरॉसवर हा फायदा ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय ग्राहकांना एक्स्टेंडेड वॉरंटी आणि काही डीलर ऑफरही मिळू शकतात. सेल्टॉसवर २० हजार रुपये लॉयल्टी आणि २० हजार रुपये कॉर्पोरेट फायदा देण्यात येत आहे.

होंडा सिटीवरही मिळेल फायदा

होंडा सिटी फेसलिफ्ट खरेदी करणाऱ्यांना ऑगस्टमध्ये ३० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. त्यासोबत ५० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज फायदा, लॉयल्टी ऑफर आणि ५ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटही मिळू शकतो. सर्व ऑफर जोडल्यास ग्राहकाला सुमारे ८५ हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. तुम्ही हे लक्षात ठेवा की प्रत्येक ऑफर प्रत्येक ग्राहकासाठी उपलब्ध नसते. फायदा शहर, डीलर, मॉडेल आणि ऑफरच्या अटींनुसार बदलू शकतो. कार खरेदी करण्यापूर्वी डीलरकडून ऑफरची संपूर्ण माहिती नक्की तपासून घ्या.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?