Mahindra XUV700 बुकिंगबाबत मोठी अपडेट… डिलिव्हरीबाबत दिलासादायक बाब आली समोर…

Mahindra XUV700 AX7 L व्हेरिएंटचा वेटिंग पिरियड 16 महिन्यांवर आला आहे. महिंद्र दर महिन्याला सरासरी 6,000 XUV700 कारची डिलिव्हरी करत आहे. महिंद्राच्या XUV700 MX व्हेरिएंटच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना काहीच महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Mahindra XUV700 बुकिंगबाबत मोठी अपडेट… डिलिव्हरीबाबत दिलासादायक बाब आली समोर…
Mahindrfa XUV 700
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 14, 2022 | 4:34 PM

महिंद्रा एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV700) ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय व मागणी असलेल्या एसयुव्हीपैकी एक आहे. महिंद्राने 2021 मध्ये ही कार बाजारात आणली होती. अगदी तेव्हापासून या कारला प्रचंड मागणी आहे. XUV700 केवळ दमदार लूक आणि दमदार फीचर्ससाठीच (Features) नाही तर ही एसयुव्ही तिच्या मोठ्या वेटिंग पीरियडसाठी (Waiting period) देखील ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी, महिंद्रा एक्सयुव्ही 700 च्या निवडक व्हेरिएंटचा वेटिंग पीरियड 19 महिन्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता या दमदार एसयूव्हीच्या डिलिव्हरीमध्ये पीरियड कमी झाला आहे. कंपनीने ग्राहकांची प्रतीक्षा थोडी कमी केली आहे.

कधी मिळणार एक्सयुव्ही?

Mahindra XUV700 च्या वेटिंग पीरियडबद्दल सांगायचे झाल्यास, ज्या ग्राहकांनी XUV700 MX, AX3 किंवा AX5 ची पेट्रोल एडिशन बुक केली आहे ते 2-3 महिन्यांत डिलिव्हरीची अपेक्षा करू शकतात. त्याच प्रमाणे या व्हेरिएंटच्या डिझेल एडिशनच्या डिलिव्हरीसाठी बहुतेक ठिकाणी साधारणत: 10 महिने प्रतीक्षा करावी लागेल.

  • व्हेरिएंट        पेट्रोल               डिझेल
  • XUV700 MX — 2-3 महिने — 10 महिन्यांपर्यंत
  • XUV700 AX3 — 2-3 महिने — 10 महिन्यांपर्यंत
  • XUV700 AX5 — 2-3 महिने — 10 महिन्यांपर्यंत
  • XUV700 AX7 — 15 महिने — 15 महिन्यांपर्यंत
  • XUV700 AX7 L — 16 महिने — 16 महिन्यांपर्यंत

टॉप व्हेरिएंटसाठी मोठी वेटिंग

Mahindra XUV700, AX7 आणि AX7 L चे टॉप-स्पेक व्हेरिएंट, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही एडिशनला सर्वाधिक मागणी आहे. Mahindra XUV700 च्या AX7 व्हेरिएंटला 15 महिने प्रतीक्षा करावी लागेल, तर AX7 L ला 16 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. Mahindra XUV700 ची सर्वात महत्त्वाचे फीचर्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

वेटिंग पीरियड कमी

Mahindra XUV700 च्या टॉप-स्पेक प्रकारासाठी प्रतीक्षा कालावधी 15-16 महिने आहे. हा वेटिंग पीरियडही खूप मोठा वाटत असला तरी यंदाच्या जुलैच्या तुलनेत तीन महिन्यांनी तो कमी झाला आहे. त्याच सोबत MX सेगमेंटचा वेटिंग पीरियड देखील खाली आला आहे. ऑटोकार इंडियाच्या ऑटो वेबसाइटनुसार, महिंद्राच्या डीलर्सचे म्हणणे आहे, की दर महिन्याला 6,000 युनिट्सची डिलिव्हरी केली जात आहे.

 

हे सुद्धा वाचा

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें