Royal Enfield चं टेन्शन वाढणार! या दमदार बाइकची फक्त 4,999 मध्ये बुकिंग सुरु, फिचर्सही शानदार
रॉयल एनफिल्डला स्पर्धा करणारी नवीन बाईक बाजारात येत आहे! आकर्षक वैशिष्ट्ये असलेल्या या शक्तिशाली बाईकचे बुकिंग केवळ ४,९९९ रुपयात सुरु होत आहे.

प्रीमियम रेट्रो मोटरसायकल ज्यांना आवडतात, त्यांच्यासाठी ट्रायम्फने (Triumph Bonneville T40) भारतात आपल्या नवीन बॉनव्हिल टी – ४० (Bonneville T40) साठी बुकिंग सुरू केले आहे. ज्यांना ही बाईक खरेदी करायची आहे. त्यांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फक्त ४,९९९ रुपयांत तिला बुकिंग करण्याची संधी आहे. या बाईकचा लूक जुन्या काळातील क्लासिक मोटरसायकलपासून प्रेरित आहे. तसेच रोजचे रायडिंग सोपे करण्यासाठी यात आधुनिक तंत्रज्ञानाचाही समावेश केला गेला आहे.
Triumph कंपनीने भारतीय बाजारपेठेत बॉनव्हिल टी- ४० सोबतच, तिची डार्क-थीम असलेली बॉनव्हिल टी- ४० ब्लॅक (Bonneville T40 Black) व्हेरिएंट आणि कमी किमतीची बॉनव्हिल टी- ४ ( Bonneville T4 ) देखील सादर केली आहे. बॉनव्हिल टी- ४० ची किंमत २.८० लाख रु. (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. टी-४० ब्लॅकची किंमतही जवळपास सारखीच आहे. बॉनव्हिल टी-४ २.५५ लाख रु. (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.
बोनव्हिल टी- ४० ची डिलिव्हरी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल
जर तुम्ही ट्रायम्फ बोनव्हिल टी-४० बुक केली, तर तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. या बाईकची भारतातील डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू होईल. मात्र, बोनव्हिल टी-४ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडा जास्त वेळ थांबावे लागेल. या मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी २०२७ च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची योजना आहे.
या दोन्ही बाईक्ससाठीचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येईल. मात्र, डिलिव्हरीच्या तारखा तुमच्या शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकतात. त्यामुळे, बुकिंग करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या डीलरकडे चौकशी करणे उत्तम होहील.
३४९ सीसी इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.
ट्रायम्फ बॉनव्हिल टी-४० मध्ये ३४९ सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. कंपनीने हे इंजिन खास बॉनव्हिल सिरीजसाठी ट्यून केले आहे. हे इंजिन २९ एचपी पॉवर आणि ३१.२ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे, ज्यामुळे बाईक वेगवेगळ्या वेगांवर नियंत्रित करण्यास मदत होते.
यात राइड-बाय-वायर थ्रॉटल टेक्नॉलॉजी देखील आहे. सोप्या भाषेत म्हणायचे तर, ही प्रणाली इंजिनच्या पॉवर आउटपुटला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित करते. याव्यतिरिक्त, स्लिप-अँड-असिस्ट क्लच स्टँडर्ड आहे. यामुळे क्लच वापरणे सोपे होते आणि गिअर बदलताना रायडरला अधिक चांगले नियंत्रण मिळते.
ब्रेक्स आणि सस्पेन्शन
बॉनव्हिल टी- ४० मध्ये आरामदायक राइडसाठी समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला ट्विन शॉक ॲबसॉर्बर्स आहेत. हे खराब रस्ते आणि लहान खड्ड्यांमुळे बसणारे धक्के शोषून घेण्यास मदत करतात.
ब्रेकिंगसाठी, बाईकमध्ये ABS सह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. यामुळे अचानक ब्रेक लावताना चाके लॉक होण्याचा धोका कमी होतो. बाईकमध्ये १८-इंचाचे पुढचे आणि १७-इंचाचे मागचे स्पोक व्हील्स आहेत.
एकंदरीत, बोनव्हिल T-40 ही क्लासिक लूकसह आधुनिक वैशिष्ट्ये शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. याची सुरुवातीची किंमत २.८० लाख रु. आहे, तर कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी बोनव्हिल T-4 हा देखील एक पर्याय आहे.
