70 किमी मायलेज देणार्या सर्वात स्वस्त बाईक, या दसऱ्याला घरी आणाच, शेवटची बाईक घेण्यासाठी प्रचंड गर्दी
70 किमी मायलेज देणाऱ्या सर्वात स्वस्त बाईक. शेवटची इतकी लोकप्रिय की लाखो चाहत्यांची आहे क्रश. दसऱ्याला तुम्ही आणू शकता घरी. किंमत फक्त 77 हजार रुपये.

दसरा आणि सणासुदीच्या काळात नवीन दुचाकी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, प्रत्येकाचे बजेट मोठे असेलच असे नाही. अशावेळी 100 CC आणि 110 CC सेगमेंटमधील कमी किमतीच्या कम्युटर बाइक्स चांगला पर्याय ठरू शकतात.
कमी देखभाल खर्च, दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्तता आणि इंधनाची बचत यामुळे या बाइक्सना मागणी असते. ऑक्टोबर 2026 मध्ये उपलब्ध माहितीनुसार, काही लोकप्रिय बाइक्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत साधारण 60 हजार ते 80 हजार रुपयांच्या आसपास आहे.
कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी Honda Shine 100 हा पर्याय आहे. या बाईकमध्ये 98.98 सीसी इंजिन असून ते सुमारे 7.4 PS पॉवर देते. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 65700 रुपये आहे.
कमी किमतीत बाईक हवी असल्यास Hero HF Deluxe चा विचार करता येईल. या बाईकमध्ये 97.2 सीसी इंजिन असून ते सुमारे 8 PS पॉवर देते. कंपनीच्या दाव्यानुसार, या बाईकचे मायलेज सुमारे 70 किमी प्रतिलिटर आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 59 हजार रुपयांपासून सुरू होते.
Hero Splendor Plus ही भारतातील लोकप्रिय कम्युटर बाइक्सपैकी एक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, तिचे मायलेज सुमारे 70 किमी प्रतिलिटर आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 77 हजार रुपयांपासून सुरू होते.