अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:24 PM, 15 Apr 2021
अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150
Bajaj Pulsar 150Dts-i

पुणे : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Pulsar 150 in just Rs 36000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 36 हजारात Bajaj Pulsar 150

CredR वर तुम्हाला केवळ 36000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Pulsar 150Dts-i बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 149cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वॉरंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Hinjawadi-Road/Bajaj-Pulsar-150Dts-i/17281) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक पुण्यात उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 24,366 किलोमीटर धावली आहे. यात तुम्हाला बाईक, टायर्स, इंजिन, परफॉरमन्स, एक्सटीरियर बॉडी, फोर्क असेंबली, मीटर सेक्शन, फ्रंट आणि रियर व्हील सेक्शनच्या फीचर्सविषयीची माहिती मिळेल.

Bajaj Pulsar 150Dts-i मधील फिचर्स

Bajaj Pulsar 150 मध्ये 149cc चं 4-स्ट्रोक, 2-वेल्व, ट्विन स्पार्क BSIV कंप्लिट DTS-i इंजिन देण्यात आलं आहे, जे 8 हजार Rpm वर 14 PS पॉवर आणि 6000 Rpm वर 13.4 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. सोबतच या बाईकच्या फ्रंटला अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कॉपिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे आणि रियरमध्ये 5-वे अॅडजस्टेबल, नायट्रॉक्स शॉक अॅब्सॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये फ्रंटला 240 mm डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. या बाईकचं कर्ब वेट 144 किलो आणि फ्युल टँक 15 लीटरचा आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

KTM ची दमदार ‘सुपर डुपर’ बाईक बाजारात, जाणून घ्या फीचर्स

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

(Buy Bajaj Pulsar 150 in just Rs 36000)