AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 29000 रुपयांत घरी न्या Hero Maestro स्कूटर, मनीबॅक गॅरंटीसह 12 महिन्यांची वॉरंटी

ही Hero Maestro स्कूटर 109 सीसी इंजिनसह येते, जी पेट्रोल इंधनावर चालते. तसेच, या स्कूटरच्या इंधन कार्यक्षमतेचा (फ्यूल एफीशिएन्सी) विचार केल्यास, ही स्कूटर 68 kmpl चं मायलेज देते. ही स्कूटर 7,500 rpm वर 8.20 bhp पॉवर जनरेट करू शकते.

अवघ्या 29000 रुपयांत घरी न्या Hero Maestro स्कूटर, मनीबॅक गॅरंटीसह 12 महिन्यांची वॉरंटी
Hero Maestro
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 1:50 PM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. Hero Maestro असे या स्कूटरचे नाव आहे. (buy Hero Maestro in just 29000 rupees)

ही Hero Maestro स्कूटर 109 सीसी इंजिनसह येते, जी पेट्रोल इंधनावर चालते. तसेच, या स्कूटरच्या इंधन कार्यक्षमतेचा (फ्यूल एफीशिएन्सी) विचार केल्यास, ही स्कूटर 68 kmpl चं मायलेज देते. ही स्कूटर 7,500 rpm वर 8.20 bhp पॉवर जनरेट करू शकते. तर 5,500 rpm वर 9.10 Nm टॉर्क देखील जनरेट करू शकते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आली आहे.

Hero Maestro नावाची ही स्कूटर बाइक्स 24 (Bikes 24) वर लिस्टेड आहे. ही पांढऱ्या रंगाची सेकंड हँड स्कूटर आहे. विक्रेत्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ही स्कूटर चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. Bikes24 वर सूचीबद्ध असलेल्या, या स्कूटरमध्ये काही महत्त्वाची माहिती चेक पॉइंटद्वारे देण्यात आली आहे, ज्यामुळे या स्कूटरची स्थिती जाणून घेण्यास मदत होते.

Hero Maestro चे हे 2014 सालातील मॉडेल आहे आणि दिल्लीतील DL-05 RTO मध्ये नोंदणीकृत आहे. ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. तसेच त्यात डुप्लिकेट चाव्या देण्यात आलेल्या नाहीत. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मूळ आरसी स्कूटरसोबत उपलब्ध असेल.

Bikes 24 वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरची किंमत 29 हजार रुपये आहे. ही स्कूटर 12 महिन्यांची वॉरंटी आणि मनी बॅक गॅरंटीसह देखील येते. कंपनीच्या काही अटी असल्या तरी त्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत, कोणतीही सेकंड हँड स्कूटर आणि कार खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही बाईक्स 24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(buy Hero Maestro in just 29000 rupees)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...