केवळ 21 हजारात घरी न्या Honda Activa स्कूटर, वॉरंटी आणि खास फीचर्स मिळणार

| Updated on: Nov 02, 2021 | 6:00 PM

Honda Activa मध्ये कंपनीने 109.5 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 7.68 bhp ची पॉवर आणि 8.79 Nm पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे या स्कूटरला चांगला वेग मिळतो.

केवळ 21 हजारात घरी न्या Honda Activa स्कूटर, वॉरंटी आणि खास फीचर्स मिळणार
Honda Activa Scooter
Follow us on

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) असे या स्कूटरचे नाव आहे. (buy Honda Activa in just 21000 rupees)

आम्ही ज्या Honda Activa स्कूटरबद्दल सांगणार आहोत, ती Bikes24 नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंट स्कूटर आहे. Honda Activa ही एक सिंपल डिझाइन असलेली स्कूटर आहे. जर तुम्ही ही होंडा अ‍ॅक्टिव्हा शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला यासाठी 70 हजार रुपये खर्च करावे लागतील. Honda Activa च्या या डीलबद्दल सविस्तर जाणून घेण्यापूर्वी, Honda Activa चे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल जाणून घेऊयात.

Honda Activa मध्ये कंपनीने 109.5 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 7.68 bhp ची पॉवर आणि 8.79 Nm पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे या स्कूटरला चांगला वेग मिळतो. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स दिले आहेत, तसेच यामध्ये ट्यूबलेस टायर आहेत.

पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना चांगलं मायलेज देणारी ही स्कूटर ग्राहकांना दिलासा देणारी आहे. Honda ची स्कूटर एक लीटर पेट्रोलमध्ये 60 किमी मायलेज देऊ शकते. Bikes24 नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही Honda Activa 2014 सालचे मॉडेल आहे आणि ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार ही स्कूटर आतापर्यंत 29,103 किमी धावली आहे आणि तिची नोंदणी हरियाणाच्या HR-51 RTO मध्ये झालेली आहे.

Bikes24 वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर काही अटींसह 12 महिन्यांच्या वॉरंटीसह येते. तसेच यावर 7 दिवसांची मनीबॅक गॅरंटी देखील आहे.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही बाईक्स 24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(buy Honda Activa in just 21000 rupees)