अवघ्या 27 हजारात घरी न्या Suzuki Access 125, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

सुझुकी Access 125 ची सुरुवातीची किंमत 85,800 रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डील बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 27 हजार रुपयांमध्ये ही स्कूटर खरेदी करू शकता.

अवघ्या 27 हजारात घरी न्या Suzuki Access 125, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
Suzuki Access 125
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:51 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. सुझुकी अॅक्सेस 125 (Suzuki Access 125) असे या स्कूटरचे नाव आहे. (buy Suzuki Access 125 in just 27000 rupees)

सुझुकी Access 125 ची सुरुवातीची किंमत 85,800 रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डील बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 27 हजार रुपयांमध्ये ही स्कूटर खरेदी करू शकता. सुझुकी अॅक्सेसमध्ये कंपनीने 124 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे, जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. 7000 rpm वर स्कूटर 8.58 bhp पॉवर जनरेट करते, तर 5000 rpm वर जास्तीत जास्त 9.8 bhp टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरमध्ये 6 लीटरची इंधन टाकी आहे, जी 45 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

आम्ही तुम्हाला ज्या स्कूटरबद्दल सांगत आहोत ती एक सेकेंड हँड स्कूटर आहे, जी बाईक्स 24 वर लिस्टेड आहे. ही स्कूटर सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. बाइक्स 24 वर सूचीबद्ध असलेल्या सुझुकी अॅक्सेस 125 स्कूटरची किंमत फक्त 27 हजार रुपये आहे. हे 2015 चे मॉडेल आहे. विक्रेत्याने या स्कूटरचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या स्कूटरने 35 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही स्कूटर दिल्लीच्या DL-08 मध्ये नोंदणीकृत आहे.

बाइक्स 24 वर सूचीबद्ध असलेल्या या स्कूटरचा तपासणी अहवाल (इंस्पेक्शन रिपोर्ट) देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये वेबसाइटच्या एक्झिक्युटिव्हने अनेक मुद्दे तपासले आहेत. मात्र, बाईक्स 24 ने या स्कूटरचा नंबर दिलेला नाही. वेबसाइटवर सूचीबद्ध असलेल्या फोटोमध्ये ही स्कूटर चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही बाईक्स 24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(buy Suzuki Access 125 in just 27000 rupees)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.