AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

56th GST Council Meeting Updates : टू-व्हीलर खरेदी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कुठल्या बाइक, स्कूटरच्या किंमती कमी होणार?

GST 2.0 : सरकारचा हा निर्णय फक्त मध्यम वर्गालाच दिलासा देणार नाही, तर ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला सुद्धा चालना मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार येणाऱ्या सणांच्या काळात टू-व्हीलर सेल आणखी वाढेल. कारण लोक नव्या वाहन खरेदीचा विचार करु शकतात.

56th GST Council Meeting Updates : टू-व्हीलर खरेदी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी,  कुठल्या बाइक, स्कूटरच्या किंमती कमी होणार?
Gst on bikes
| Updated on: Sep 04, 2025 | 10:05 AM
Share

सरकारने 56 व्या GST परिषदेच्या बैठकीत 12 आणि 28 टक्क्याचे 2 टॅक्स स्लॅब संपवलेत. आता फक्त दोन टॅक्स स्लॅब आहेत. 5 टक्के आणि 18 टक्के. हे नवीन रेट्स 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाइक Hero Splendor आणि स्कूटर मार्केटमध्ये Honda Activa च्या किंमतीवर होणार आहे. जर, तुम्ही नवीन बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर नव्य बाइकसाठी तुम्हाला किती रक्कम मोजावी लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

350 सीसी पेक्षा कमी इंजिन्सच्या बाइकवर जीएसटी 28 टक्क्यांनी घटवून 18 टक्के करण्यात आला आहे. यात सर्वसामान्यांच्या पसंतीच्या बाईक्स जसं की, बजाज पल्सर किंवा होंडा अॅक्टिवा पहिल्यापेक्षा अजून स्वस्त होणार आहेत.

कुठल्या बाइक महागणार?

जर, तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन 350 सीसीपेक्षा मोठी बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रॉयल एनफिल्ड सारख्या क्रूजर बाइकवर आता 40 टक्के जीएसटी लागेल. आधी या बाइक्सवर 28 टक्के जीएसटी लागायचा आणि 3-5 टक्के सेस होता. एकूण मिळून 32 टक्के टॅक्स लागायचा. आता हा सेस हटवण्यात आला असून 40 टक्के फ्लॅट टॅक्स लावला आहे.

याचा फायदा दोन वर्गांना

सरकारचा हा निर्णय फक्त मध्यम वर्गालाच दिलासा देणार नाही, तर ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला सुद्धा चालना मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार येणाऱ्या सणांच्या काळात टू-व्हीलर सेल आणखी वाढेल. कारण लोक नव्या वाहन खरेदीचा विचार करु शकतात. एक उदहारण म्हणून सांगतो. नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर हीरो स्प्लेंडर प्लसची किंमत किती होईल. दिल्लीत हीरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरूम किंमत सध्या 79,426 रुपये आहे. जर, या बाइकवर जीएसटीत 10 टक्के कपात लागू झाली, तर बाईकची किंमत 7,900 रुपयांनी कमी होईल. याचा थेट फायदा ग्राहकांना होईल.

ऑन-रोड किंमत किती?

बाइकच्या एक्स-शोरूम किंमतीशिवाय 6,654 रुपये आरटीओ शुल्क, 6,685 रुपये इंश्योरेंस प्रीमियम आणि जवळपास 950 रुपये दुसरा चार्ज असतो. या सगळ्या किंमती जोडल्यानंतर दिल्लीत स्प्लेंडर प्लसची ऑन-रोड किंमत जवळपास 93,715 रुपये होते. टॅक्स कमी केल्याचा परिणाम पूर्णपणे लागू झाला, तर आधीपेक्षा या बाईक अजून स्वस्त होतील.

Follow Us
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?