वादळात कारचे मोठे नुकसान, विम्याचा फायदा मिळेल का? नियम तर माहिती करून घ्या

Car Insurance Benefits: पावसाळ्यात वादळामुळे झाडं उन्मळून पडतात. फांद्या पडतात. विजेचे खांब कोसळतात. इतर वस्तू उडून मोठे नुकसान होते. कारचे जर अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर विम्याचा फायदा मिळतो का? काय आहे याचे उत्तर?

वादळात कारचे मोठे नुकसान, विम्याचा फायदा मिळेल का? नियम तर माहिती करून घ्या
| Updated on: Jun 06, 2026 | 4:16 PM

Car Insurance in Natural Disasters: पावसाळ्यात वादळीवाऱ्याने दाणादाण उडते. झाडं उन्मळून पडतात. घरावरील पत्रे उडून ती कारवर आदळतात. अथवा विजेचा खांब कोसळून, फांद्या पडून कारचे नुकसान होऊ शकते. कधी कधी भिंत खचते आणि कारवर पडते. अशा नैसर्गिक आपत्तीत कार मालकाला विम्यासाठी दावा दाखल करता येतो का? Comprehensive Insurance मध्ये अशा नुकसानीची भरपाई मिळते. तर थर्ड पार्टी पॉलिसीमध्ये त्याची तरतूद नसते. त्यामुळे फायदा मिळत नाही. जर झाडं कोसळले अथवा इतर नुकसान झाले तर लागलीच विमा कंपनीला सूचना द्या. फोटो काढा. एखादा व्हिडिओ शूट करा. सर्व्हेअरच्या तपासणीनंतर कार दुरुस्तीला पाठवा. त्यापूर्वी कोणतीही घाई करू नका. नाहीतर भरपाई मिळवण्यात अडचण येऊ शकते.

या तीन चार महिन्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मेघांचा गडगडाच ऐकू येतो. पण यामुळे वाहनांचं नुकसान होण्याची भीती अधिक असते. झाडाच्या फांद्या, झाड, पत्रे, दगड अथवा इतर मोठ्या वस्तू पडून वाहनांचे मोटे नुकसान होण्याची शक्यता असते. कारचे बोनट, छत अथवा विंडशील्ड तुटू शकते. त्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देते का हा असा प्रश्न वाहनधारकांच्या मनात घर करतो.

विम्याचा दावा मंजूर होईल का?

Car चे असे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळेल की नाही हे तुम्ही कारसाठी घेतलेल्या विमा पॉलिसीवर अवलंबून आहे. कॉम्प्रिव्हेंसिव्ह (Comprehensive) मोटार इन्शुरन्स असेल तर नैसर्गिक आपत्ती, वादळ, पाऊस, झाड पडणे, महापूर आल्यास कारचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई मिळू शकते.

थर्ड-पार्टी इन्शुरन्सला नाही फायदा

जर तुमच्याकडे केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असेल तर विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही. कारण ही पॉलिसी केवळ दुसरी व्यक्ती, वाहनाच्या नुकसानाची भरपाई देते. पण तुमच्या कारसाठी ही पॉलिसी मदतीला येणार नाही. नुकसान भरपाई मिळणार नाही.

नुकसान झाल्यावर काय कराल?

चांगल्या कॅमेऱ्यातून झाड पडलेल्या कारचे फोटो घ्या. व्हिडिओ तयार करा.

विमा कंपनीला लागलीच या घटनेची माहिती द्या. मोबाईल ॲप आणि साईटवर क्लेम दाखल करा.

विमा कंपनीला दस्तावेज जमा करा. पॉलिसी क्रमांक, वाहनांचे कागद आणि नुकसानीचा दावा करा.

सर्व्हेयरची वाट पाहा. जोपर्यंत सर्व्हेयर येत नाही. तोपर्यत कार दुरुस्तीला पाठवू नका.

Follow Us