Car | कारचे पण जपा आरोग्य! वेळेवर केली सर्व्हिसिंग, मग व्हा बेफिकर
Car Service | कारची देखभाल केली नाही तर ती रस्त्यात केव्हा धोका देईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे वेळोवेळी इंजिन ऑईल आणि एअर फिल्टरचे काम करुन घ्या. पण अनेकजण किलोमीटरच्या आकडेवारीत फसून जातात आणि सर्व्हिसिंग करत नाहीत. त्याचा त्यांना फटका बसतो.
नवी दिल्ली | 21 January 2024 : कारची नियमीत सर्व्हिसिंग अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कार अनेक वर्षे खराब होत नाही. कारमध्ये असे अने पार्टस् असतात की ज्यांना वेळोवेळी बदलत राहणे आवश्यक आहे. इंजिन ऑईल, एअर फिल्टर, कूलंट, ब्रेक शू, यासारख्या वस्तू बदलत राहणे गरजेचे आहे. अनेकदा कार खरेदी केल्यानंतर फ्री सर्व्हिसिंग करण्यात येते. त्यानंतर कारकडे दुर्लक्ष होते. तर काहींना किती किलोमीटर कारचा वापर केला तर पार्ट बदलावे, ऑईल बदलावे याचे गणित जुळवता येत नाही.
- इंजिन ऑईल – इंजिन ऑईलमुळे इंजिनच्या सर्व भागांना वंगण मिळते. त्यामुळे इंजिन गरम होत नाही. तापमान कमी राहते. इंजिन ऑईल तसेच राहिल्यास वाहन गरम होऊ शकते. त्यामुळे एका वर्षानंतर अथवा 10,000 किलोमीटरनंतर इंजिन ऑईल बदलणे आवश्यक आहे.
- ब्रेक ऑईल – ब्रेक ऑईल, ब्रेक सिस्टिमला योग्य काम करण्यासाठी मदत करते. ते ब्रेक पॅड आणि डिस्क यांच्या दरम्यानचे घर्षण कमी करतो. भारतीय रस्ते पाहता ब्रेक ऑईल वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक 40,000 किलोमीटरवर ब्रेक ऑईल बदलणे आवश्यक आहे.
- ऑईल फिल्टर – ऑईल फिल्टर इंजिन ऑईलला धूळ आणि कचऱ्यापासून वाचवते. सातत्याने वाहन चालल्यामुळे ऑईल फिल्टर खराब होते, घाण होते. त्यासाठी 10,000 किलोमीटरनंतर ऑईल फिल्टर बदलणे गरजेचे ठरते.
- एअर फिल्टर – एअर फिल्टर इंजिनचे खराब हवेपासून बचाव करते. ऑईल फिल्टरसारखेच एअर फिल्टरपण सतत वाहन सुरु असल्याने खराब होते. 30,000 किलोमीटरनंतर ते बदलणे आवश्यक आहे.
- कूलंट – कूलंट इंजिनला थंड ठेवते. जर तुमच्याकडे टोयोटा कार आहे तर 1.60 लाख किलोमीटर नंतर कूलंट बदलवा. मारुती सुझूकी कार असेल तर 20,000 किलोमीटर नंतर कुलूंट बदलवा.
- गिअर ऑईल – गिअर बॉक्समध्ये वंगण करण्याचे काम गिअर ऑईल करते. त्यामुळे गिअर बॉक्स थंडा राहतो. हे ऑईल बदलण्याची खास वेळ नाही. पण जेव्हा तुम्ही गिअरबॉक्स बदलवता, तेव्हा गिअर ऑईल पण बदलवणे आवश्यक आहे.
- इंजिन फ्लशर – इंजिन फ्लशर इंजिनमधील जमा झालेली घाण, धूळ, गढूळ आणि खराब इंजिन बाहेर काढते. जेव्हा कार सर्व्हिसिंगला टाकता. इंजिन ऑईल बदलवत असाल तर इंजिनचे फ्लशर बदलवणे आवश्यक आहे.
- फ्युएल फिल्टर – फ्युएल फिल्टर पेट्रोल-डिझेलमध्ये घाण येण्यापासून थांबवते. जर तुम्हाला इंधनाची गुणवत्ता टिकवायची असेल तर 40,000 ते 80,000 किलोमीटरनंतर फ्युएल फिल्टर बदलवणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा