AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Resale : जुन्या कारला पण सोन्याचा भाव, या टिप्स ठेवा लक्षात

Car Resale : जुन्या कारला चांगला दाम मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. जुनी कार एकहाती आणि सुस्थिती असेल तर भाव पण चांगला मिळू शकतो. पण काही गोष्टींचा अडथळा पार करावा लागेल. योग्य नियोजन केले तर तुमच्या जुन्या कारला पण सोन्याचा भाव मिळेल. त्यासाठी या टिप्स महत्वाच्या ठरतात..

Car Resale : जुन्या कारला पण सोन्याचा भाव, या टिप्स ठेवा लक्षात
| Updated on: Sep 20, 2023 | 7:09 PM
Share

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : जुन्या कारला (Old Car) विकायची प्लॅनिंग करत आहात का? तर खरेदीदार सहज मिळेल. पण कारची चांगली किंमत मिळेल का? कार ट्रान्सफर करणे पण सोपे काम नाही. जुनी कार तुम्ही थेट विक्री करु शकता अथवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करु शकता. बाजारात अनेक कार विक्री करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तर काही वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या जुन्या कार ग्राहकाकडून खरेदी करुन त्या दुसऱ्यांना पण विक्री करतात. तुमच्या जुन्या कारची चांगली किंमत मिळू शकते. जुन्या कारला चांगला दाम मिळावा ही कोणाची इच्छा नसते. योग्य नियोजन केल्यास तुमच्या जुन्या कारला पण सोन्याचा भाव मिळू शकतो. त्यासाठी काही टिप्स (Used Car Selling Tips)महत्वाच्या ठरतील.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा काय

ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास कागदपत्रांची झंझट कमी होते. हे काम हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म झटपट पूर्ण करतात. ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी कार मालकाला RTO च्या फेऱ्या माराव्या लागतात. पण त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म काही शुल्क आकारतात.

कार दुरुस्त केली का?

कार विक्री करण्याची तयारी करत असाल तर सर्वात पहिले कार दुरुस्त करणे आवश्यक आहे. किरकोळ दुरुस्ती असली तरी ती झटपट पूर्ण करा. कारचे काही काम बाकी असेल तर ते पण पूर्ण करा. त्यामुळे कार दमदार कामगिरी बजावेल. कारची किंमत वाढेल. कारची रिसले व्हॅल्यू ठरवण्यासाठी मॉडेल, कंडिशन, मायलेज आणि एसेसरीज महत्वाची असते. त्याकडे लक्ष द्या.

अशी मिळेल जुन्या कारची किंमत

  1. Car Service : कारची सर्व्हिस हिस्ट्री मेंटन ठेवा. ऑईल, एअर आणि फ्युअल फिल्टर चेंज करा
  2. Rubbing Polishing : यामुळे कारवरील स्क्रॅच निघून जातात. कारला लूक येईल
  3. Dry Cleaning : ड्राई क्लीनमुळे कार फ्रेश आणि क्लीन दिसते. एअर फ्रेशर ग्राहकांना आकर्षीत करेल
  4. Windhield Wiper : विंडशील्ड वायपरची कंडिशन चांगली असावी. क्रॅक असेल तर फायदा होत नाही
  5. Tyres : तुमचे टायर अधिक खराब असेल तर ते बदलून घेणे फायदेशीर ठरेल
  6. Burned Out Lights : सुरक्षित प्रवासासाठी कारचे लाईट चांगले असणे सर्वात महत्वाचे आहे
  7. Seat Covers : कारचे इंटिरिअर चांगले असावे. सीट चांगले असावे. त्याला कव्हर असावे
  8. Spark Lights : जर इंजिन जास्त आवाज करत असेल तर स्पार्क लाईट बदलणे आवश्यक आहे
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.