कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

| Updated on: Feb 24, 2021 | 11:23 AM

तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय
Renault Kwid, Datsun Redi Go, Maruti Suzuki Alto
Follow us on

मुंबई : तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही प्रीमियम कार खरेदी करण्यास आर्थिकदृषट्या असमर्थ असल्यास तुमच्यासाठी एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार सर्वोत्तम पर्याय ठरतात. कारण या गाड्या अगदी कमी किंमतीत विकत घेता येतात आणि त्यामध्ये प्रीमियम गाड्यांशी स्पर्धा करणारे जबरदस्त फीचर्सही मिळतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या स्वस्त कारची (Cheapest Hatchback cars) यादी घेऊन आलो आहोत, या कार तुम्ही 4 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. (Cheapest Hatchback cars available in India, Cars under 4 lakh)

Renault Kwid BS6 (रेनॉ क्विड)

रेनॉ क्विड बीएस 6 ही एक एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे. Renault Kwid BS6 या कारची सुरुवातीची किंमत 3.12 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)

मारुती सुझुकी अल्टोची दिल्लीची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. सुझुकी अल्टोकडे शक्तीसाठी 796 सीसी, 3-सिलेंडर, 12-वाल्व, बीएस -6 कम्प्लायंटचं इंजिन आहे. या कारच्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झाल्यास तिचे इंजिन 6000 आरपीएम वर 48PS ची जास्तीत जास्त पॉवर आणि 3500 आरपीएम वर 69 एनएम पीक टॉर्क तयार करतं. ऑल्टो इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

Maruti S-Presso (मारुती सुझुकी एस-प्रेसो)

ही कार हारटेक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे, त्यामुळे या कारचं वजन खूपच कमी आहे. दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरुम किंमत 3.69 लाख रुपये आहे, तर याच्या हाय व्हर्जनची किंमत 4.91 लाख रुपयांपर्यंत आहे. सध्या ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनसोबत बाजारात उपलब्ध आहे. Maruti S-Presso ही चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard, LXI, VXI आणि VXI+ यांचा समावेश आहे. या गाडीत 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. S-Presso च्या कॉन्सेप्टला 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती फ्युचर-एस या नावाने दर्शवण्यात आलं होतं.

मारुती एस-प्रेसोचा फ्रंट लूक खूप बोल्ड आहे. यामध्ये हाय बोनट लाईन, क्रोम ग्रील आणि मोठे हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. एलईडी डीआरएल हेडलाईटच्या खाली आहे. फ्रंट आणि रिअर बंपर मोठा आहे. मारुतीची ही लहान कार 6 रंगात उपलब्ध आहे. दिसायला ही गाडी लहान असली तरी कुठल्या SUV पेक्षा कमी नाही. एस-प्रेसोला मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे.

डॅटसन रेडी-गो (Datsun Redi-Go)

भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गोची (Datsun Redi-Go) सुरुवातीची किंमत दिल्लीची एक्स-शोरूममध्ये 2.86 लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉपच्या मॉडेलवर 4.82 लाखांवर गेली आहे. डॅटसन रेडी-गो भारतीय बाजारात 0.8- लीटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या कारचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते. त्याच वेळी रेडी-गोचे 1 लिटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

(Cheapest Hatchback cars available in India, Cars under 4 lakh)