सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

दक्षिण कोरियाई ऑटोमेकर कंपनी ह्युंदाय मोटर्सने (Hyundai Motors) मंगळवारी त्यांची मिड-साइज क्रॉसओव्हर Ioniq 5 लाँच केली आहे. (Hyundai Ioniq 5 electric)

सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Hyundai Ioniq 5
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:16 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Hyundai Ioniq 5 electric crossover launches with 480 kilometer driving range know more about it)

दक्षिण कोरियाई ऑटोमेकर कंपनी ह्युंदाय मोटर्सने मंगळवारी (23 फेब्रुवारी) त्यांची मिड-साइज क्रॉसओव्हर Ioniq 5 लाँच केली आहे. कंपनीला त्यांच्या या इलेक्ट्रिक कारकडून खूप अपेक्षा आहेत. हा कारच्या जोरावर ह्युंदाय कंपनी 2025 पर्यंत टॉप 3 ग्लोबल इलेक्ट्रिक व्हीकल मेकर्स लिस्टमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे. ह्युंदायने याबाबत म्हटले आहे की, हे मॉडल नवीन इलेक्ट्रिक व्हीकल-ओन्ली प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे जे स्वतःच्या बॅटरी मॉड्यूल टेक्नोलॉजीचा वापर करतं. तसेच यामध्ये सध्याच्या इलेक्ट्रिक कार्सपेक्षा कमी कम्पोनंट्सची आवश्यकता आहे. त्यामुळेच कमी किंमतीत या कारचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं.

Hyundai Ioniq 5 मध्ये 480KM ड्रायव्हिंग रेंज मिळणार

Hyundai Ioniq 5 या कारमध्ये जास्तीत जास्त 480 किलोमीटर (298 मैल) पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळेल जी Kona EV पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती. Ioniq 5 या कारमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पॅक मिळतील. ज्यामध्ये 58kWh किंवा 72.6kWh चा समावेश आहे. कंपनीने म्हटलंय की, काही ठराविक ठिकाणी या वर्षीच्या पहिल्या सहामाहीमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ह्युंदाय Ioniq 5 चे फीचर्स

Ioniq 5 च्या केबिनमध्ये डॅशबोर्ड, स्विच, स्टीयरिंग व्हील आणि डोर पॅनल पॉलीयूरीथेन बायो पेंटने पेंट केलं आहे. ही कार लांब व्हीलबेस आणि फ्लॅट फ्लोरला सपोर्ट करते. या कारच्या पुढच्या सीट्ससाठी आणि डॅशच्या ओव्हरहेड शॉटमध्ये दोन स्क्रीन्स, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. यासोबतच Ioniq 5 च्या टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या उजव्या बाजूला एक फिजिकल ड्राइव्ह स्टॉल्क दिला आहे.

ह्युंदाय Ioniq 5 ची किंमत

ह्युंदायने अद्याप त्यांच्या या कारच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु ह्युंदाय मोटर युरोपचे अध्यक्ष मायकल कोल म्हणाले की, सरकारी इन्सेंटिव्हज न जोडता या कारची सुरुवातीची किंमत 42,000 युरो (51,100 डॉलर) असू शकते. याचा अर्थ भारतात या कारची किंमत 36 लाख 96 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. कंपनी पुढील वर्षापर्यंत या कारच्या 100000 युनिट्स विक्रीचं प्लॅनिंग करत आहे. यापैकी 30 ते 40 टक्के वाहनं युरोपात, 30 टक्के वाहनं उत्तर अमेरिकेत आणि 20 टक्के वाहन दक्षिण कोरियामध्ये विकली जातील, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Hyundai Ioniq 5 electric crossover launches with 480 kilometer driving range know more about it)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.