चीनची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार भारतात होणार लाँच, क्रेटा इलेक्ट्रीकशी तगडी स्पर्धा

इलेक्ट्रीक कारचे मार्केट विस्तारत आहे,इंधनाचे वाढते दर पाहाता आणि इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. अशा आता चीनची सर्वात स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक सुव्ह भारतात येत असून तिची तगडी स्पर्धा क्रेटा इलेक्ट्रीकशी होणार आहे.

चीनची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार भारतात होणार लाँच, क्रेटा इलेक्ट्रीकशी तगडी स्पर्धा
BYD Atto 2 electric SUV
| Updated on: Aug 24, 2025 | 3:43 PM

चीनची प्रसिद्ध कार कंपनी BYD भारतातात आता तिच्या इलेक्ट्रीक कारची रेंजला आणि वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आधीच भारतीय बाजारात Atto 3, Seal, eMax 7 आणि Sealion सारख्या कार लाँच केल्या आहेत. आता कंपनी तिची नवीन इलेक्ट्रीक एसयुव्ही Atto 2 ची भारतात टेस्ट करत आहे. अलिकडेच या कारला भारतात टेस्ट करताना पाहिले गेले आहे.

BYD Atto 2 Electric SUV किंमत काय ?

BYD चे Atto 2 इलेक्ट्रीक सुव्ह युकेच्या मार्केटमध्ये याआधीच लाँच झाले आहे. या सुव्हच्या फिचर्स आणि सेटअपमध्ये थोडा बदल केलेला आहे. या कारची भारतातील किंमत 35 लाख रुपये एक्स शोरुम असू शकते असे म्हटले जात आहे. भारतात या कारचा मुकाबला क्रेटाची इलेक्ट्रीक कारशी होणार आहे.

BYD Atto 2 चे बॅटरी ऑप्शन काय आहे

वाहन निर्मिती कंपनी भारतात युरो- स्पेक BYD Atto 2 ला लाँच करु शकते. यात 45 kWh BYD ब्लेड बॅटरी पॅक असणार आहेत. जो एकदा चार्ज केल्यानंतर WLTP द्वारा दावा केल्यानुसार 463 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. BYD Atto 2 मध्ये एक FWD मोटर आहे. जी 174 bhp ची कमाल पॉवर असेल आणि 290 Nm चे कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रीक पॉवरट्रेन यास 160 किमी प्रति तासांच्या वेगाने 7.9 सेंकदात 0 ते 100 किमीचा वेग देण्यास सक्षम बनवते.

या सुव्हमध्ये खास काय ?

डिझाईनचा विचार करता BYD Atto 2 ही सुव्ह पुढून खूपच दमदार दिसते. या इलेक्ट्रीक सुव्हमध्ये ‘मोबियस रिंग’ कनेक्टेड एलईडी टेल लाईट्स, NFC की, वायरलेस एंड्रॉईड ऑटो आणि एप्पल कारप्ले, पॅनॉरमिक सनरुफ, एल्युमिनियम रुफ रेल्स, इलेक्ट्रीक फोल्डींग ORVMs आणि रेन-सेंसिंग वायपरचा समावेश आहे.