AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पोर्ट्‌स बाइक Suzuki Hayabusa मध्ये काही बदल, तब्बल 18 नवीन शेड्‍स उपलब्ध

सुझुकी हायाबुसा 185 hp ची अतिरिक्त पावर आउटपूट प्रोड्यूस करु शकते. ही स्पोर्ट्‌स बाइक सिक्स स्पीड कांस्टेंट मॅश ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. सुझुकी हायाबुसामध्ये दुसरे फीचर्सच्या माध्यमातून रीट्यून सस्पेंशन, एक चांगली ब्रेकिंग सिस्टम, ब्रिजस्टोन बेटलेक्स, हायपरस्पोर्ट टायरचा एक सेट, एक ड्युअल चॅनेल एबीएस सिस्टीमदेखील मिळणार आहे.

स्पोर्ट्‌स बाइक Suzuki Hayabusa मध्ये काही बदल, तब्बल 18 नवीन शेड्‍स उपलब्ध
suzuku hayabusa
| Updated on: Jul 04, 2022 | 4:10 PM
Share

जपानची प्रसिध्द ऑटोमोबाईल कंपनी सुझुकीने आपली लोकप्रिय स्पोर्ट्‌स बाइक (sports bike) सुझुकी हायाबुसा (Suzuki Hayabusa) मध्ये काही बदल केले आहेत. कंपनीने हायाबुसाच्या कलर व्हेरिएंटमध्ये मोठे बदल करीत त्यात अजून 18 नवीन कलर समाविष्ठ केले आहेत. याआधी जपानी स्पोर्ट्‌स बाइकमध्ये तीन कलर ऑप्शन (color options), थंडर ग्रे मॅटेलिक, कँडी डार्लिंग रेड, ग्लास स्पार्कल ब्लॅक/मँटे ब्लॅक मॅटेलिक नंबर 2 आणि ब्रिलियंट व्हाइट/पर्ल बिगर ब्लू होते. कंपनीने 18 नवीन बॉडी शेड्स जोडले असून हे स्पेशन आर्डरच्या माध्यमातून कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. युजर्स या खास कलरच्या बाईकला जागतिक बाजारात कंपनीच्या डीलरशिपच्या माध्यमातून खरेदी करु शकणार आहेत. या लेखाच्या माध्यमातून हायाबुसाचे कलर व्हेरिएंट आणि फीचर्सबाबत अधिक माहिती घेणार आहोत.

विविध कलर कॉम्बिनेशन

कलर्स ऑर्डर प्लॅनअंतर्गत युजर्स स्टँडर्ड व्हेरिएंटमधून स्वत:चा वेगळेपणा दाखविण्यासाठी बॉडी कलर आणि व्हील कलरच्या विविध कॉम्बिनेशनला निवडू शकणार आहेत. युजर्स रेग्युलर हायाबुसामध्ये मिळणार्या ब्लॅक पेंट व्हीलच्या एवजी दुसरे कलरला बेस बनवू शकणार आहेत. युजर्सजवळ विविध एक्सेंटसह मोनोटोन कलर निवडण्याची संधी आहे.

हायाबुसाचे इलेक्ट्रानिक फीचर्स

जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये थर्ड जेन हायाबुसाला अधिक चांगल्या टेक्नॉलॉजीसह अनेक इलेक्टॉनिक फीचर्सही मिळणार आहेत. युजर्सला हाइपर स्पोर्ट्‌स टूरर सिक्स-एक्सिस आयएमयु सिस्टम, राइड-बाय-वायर थाटल, ट्रँक्शन कंट्रोल, एंटी-लिफ्ट कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस सिस्टम, व्हीली कंट्रोल, क्विकशिफ्टर, हिल असिस्टर, लाँच कंट्रोल, राइड मोड सारखे फीचर्सही मिळणार आहेत.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ट्‌विन-स्पार सारखे ॲल्यूमिनिअम फ्रेमवर बनविलेले नवीन हायाबुसामध्ये फुल एलईडी हेडलाईट आणि एलईडी टेललाईट, नवीन टीएफटी डिसप्ले दिसणार आहेत. या सर्वांसोबत नवीन डिझाईन करण्यात आलेले इंस्ट्रूमेंट कंसोल, एक लांब विंडस्क्रीन, एयरोडायनमिक बॉडीसह स्लीकिंग स्टाइलिंग मिळणार आहे. ही बाइक 1340सीसी इनलाइन फोन सिलेंडर लिक्विड कूल्ड फोर स्ट्रोक DOHC इंधन इंजेक्टेड इंजिनने परिपूर्ण आहे.

इतर फीचर्स

सुझुकी हायाबुसा 185 hp ची अतिरिक्त पावर आउटपूट प्रोड्यूस करु शकते. ही स्पोर्ट्‌स बाइक सिक्स स्पीड कांस्टेंट मॅश ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. सुझुकी हायाबुसामध्ये दुसरे फीचर्सच्या माध्यमातून रीट्यून सस्पेंशन, एक चांगली ब्रेकिंग सिस्टम, ब्रिजस्टोन बेटलेक्स, हायपरस्पोर्ट टायरचा एक सेट, एक ड्युअल चॅनेल एबीएस सिस्टीमदेखील मिळणार आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.