AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki Alto K10 खरेदी करण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…

मारुती सुझुकी अल्टो K10 च्या एंट्रीमुळे भारतातील लहान कारच्या मार्केटला आता नवीन बूस्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. अनेक जण आपल्या गरजेनुसार छोट्या कारलाच पसंती देत असतात. तुम्हीही अशाच एखाद्या लहान कारच्या शोधात असाल तर नवीन Alto K10 हा एक चांगला पर्याय आहे.

Maruti Suzuki Alto K10 खरेदी करण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…
नवीन मारुती सुझुकी Alto K10Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2022 | 12:12 PM
Share

भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) अल्टोचे थर्ड जनरेशन मॉडेल (Alto K10) बाजारात आणले आहे. अल्टोच्या नवीन मॉडेलने K10 सब-ब्रँडसह मार्केटमध्ये एंट्री केली आहे. मारुती अल्टो K10 दोन वर्षांपूर्वी B6 उत्सर्जन नियमांमुळे बंद करण्यात आली होती. नुकतीच लाँच झालेली मारुती सुझुकी अल्टो K10 पूर्वीपेक्षा काहीशी मोठी आहे. भारतीय ग्राहकांना त्यात अगदी नवीन एक्सटीरियर आणि इंटीरियर कंसेप्ट बघायला मिळणार आहे. नवीन K10C पेट्रोल इंजिनमध्ये अनेक आकर्षक फीचर्सदेखील (Features) देण्यात आली आहेत. तुम्ही एंट्री लेव्हल कार खरेदीदार असाल आणि तुम्ही अल्टो के10 ची निवड केली असेल तर, पुढील पाच गोष्टी तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहेत.

  1. अल्टो के10 च्या बेस व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. तर दुसरीकडे त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्सशोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. याचा अर्थ असा की नवीन अल्टोची किंमत Alto 800 पेक्षा 60,000 रुपये अधिक आहे. अल्टो K10 मारुती एस-प्रेसो पेक्षा 25,000 रुपये स्वस्त आहे.
  2. मारुती अल्टो के10 चे डिझाईन पूर्वीपेक्षा जास्त राउंड शेप आहे. त्यामुळे त्याचा लूक मारुती सेलेरियोसारखा आहे. अल्टो के10 ला हबकॅप्ससह 13 इंच स्टील व्हील मिळतात. त्यासोबतच एक मोठी ग्रिल मिळते आणि अल्टो के10 चा मागील भाग सेलेरियोशी थोडासा मेळ खातो.
  3. नवीन अल्टोमध्ये सेलेरियो आणि एस-प्रेसो सारखी 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आली आहे. अल्टो के10 च्या स्क्रीनच्या बाजूला सिल्व्हर एक्सेंट देखील देण्यात आला आहे. याला सेलेरियो आणि एस-प्रेसोप्रमाणे स्क्रीनच्या तळाशी फ्रंट पॉवर विंडो बटण देखील मिळते. अँपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
  4. अल्टोचे नवे मॉडेल हे तिसऱ्या व्हेरिएंटचे मॉडेल आहे. यात 67hp, 1 लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सेलेरियो आणि एस-प्रेसोमध्ये देखील वापरले जाते. अल्टो के10 मध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी ऑटोमॅटिक आहे.
  5. भारतीय बाजारपेठेत, अल्टो के10 थेट रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करते. दरम्यान, अल्टो के10 चे खरेदीदार अल्टो 800 आणि एस-प्रेसोचा देखील विचार करु शकतात. अल्टो के10 च्या किमती पाहता, मारुती सुझुकीच्या लाइनअपमधील इतर कारचाही विचार केला जाऊ शकतो.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं