AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

fortuner : नवीन स्कॉर्पियोला टक्कर देण्यासाठी फॉर्च्यूनरचे नवीन हायब्रिड मॉडेल… उत्तम मायलेजसह विविध वैशिष्ट्ये

सर्वात आधी थायलंडमध्ये लाँच करण्यात आलेली इलेक्ट्रिफाइड फॉर्च्यूनर देशात आपल्या सारखी पहिली 7 सीट पिकअप प्लॅटफॉर्म व्हीकल असणार आहे. फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल पावरट्रेनमध्ये 1GD-FTV 2.8 लीटर इंजिनचा वापर करण्यात येणार आहे.

fortuner : नवीन स्कॉर्पियोला टक्कर देण्यासाठी फॉर्च्यूनरचे नवीन हायब्रिड मॉडेल... उत्तम मायलेजसह विविध वैशिष्ट्ये
fortunerImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: May 28, 2022 | 12:30 PM
Share

मुंबई : गेल्या वर्षी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, टोयोटा (toyota)एक डिझेल हायब्रिड पॉवरट्रेनवर काम करत असल्याची माहिती समोर आली होती. आता हे एक माइल्ड-हायब्रिड टर्बो डिझेल पावरट्रेन मॉडेल असल्याचे स्पष्ट होत आहे. फॉर्च्यूनर (Fortuner) या नवीन पावरट्रेनने परिपूर्ण असलेली पहिली टोयोटो एसयुव्ही ठरणार आहे. सर्वात आधी थायलंडमध्ये लाँच करण्यात आलेली इलेक्ट्रिफाइड फॉर्च्यूनर देशात आपल्या सारखी पहिली 7 सीट पिकअप प्लॅटफॉर्म व्हीकल असणार आहे. फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल (mild hybrid turbo diesel) पावरट्रेनमध्ये 1GD-FTV 2.8 लीटर इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. याला एक इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर मिळण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा इंटीग्रेटर पहिल्यापासूनच सध्याच्या सुझुकी माइल्ड हायब्रिड मॉडलमध्ये उपलब्ध आहे. परंतु यात फरक फक्त एवढाच आहे, की याला डिझेल मोटरसोबत जोडण्यात येणार आहे. Geely Okavango सारखया काही दुसर्या कार्समध्येही ISG चा वापर करण्यात आलेला आहे.

2023 टोयोटा फॉर्च्यूनर माइल्ड-हायब्रिड डिझेल

फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल व्हेरिएंट ब्रेकिंग आणि डिसीलरेशनच्या दरम्यान काइनेटिक एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये बदलण्यासाठी सक्षम ठरणार आहे. फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रड डिझेल पावरट्रेनच्या बाबतीत अजून या व्यतिरिक्त काही अपडेट उपलब्ध नाहीत. पॉवर, टॉर्क, मायलेज आदी गोष्टींची आताच माहिती मिळेल याची माहिती अद्याप लिक झालेली नसली तरी सध्याचे 1GD-FTV 2.8 लीटर इंजिन प्रभावी असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ही मोटर थाई-स्पेक फॉर्च्यूनर लीजेंडर 4 डब्ल्यूडी व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे. आपल्या सध्याच्या मॉडेलमध्ये इंजिन 204 पीएसची जास्तीत जास्त पॉवर आउटपूट आणि 500 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करता येणार आहे. याला सिक्वेंशियल शिफ्ट आणि पॅडल शिफ्टसह 6 स्पीड एटीसह जोडले जाणार आहे.

चांगल्या मायलेजची अपेक्षा

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल व्हेरिएंटला टॉप स्केल लेजेंडर व्हेरिएंटपेक्षा कमी किंमतीत सादर केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय हायब्रिड कार्समध्ये एक नवीन मारुती टोयोटा कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. एक कॉमन प्लॅटफॉर्मवर आधारीत मारुती टोयोटा एसयुव्ही आपल्या युनिक स्टाईलसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या कारमध्ये सेगमेंट फर्स्ट सेल्फ चार्जिंग हायब्रिड पावरट्रेनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यातून कारला चांगला मायलेज मिळण्याची शक्यता वाढणार आहे. मायलेजबाबत ग्राहक चांगल्या मायलेजची अपेक्षा नक्कीच करु शकतील. टोयोटाच्या या एसयुव्ही व्हर्जनचे पुढील महिन्यात अनावरण होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मारुतीचे व्हर्जन सणासुदीच्या दिवसांमध्ये लांच होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?