फ्रांसच्या कंपनीची पहिली मेड इन इंडिया कार… Citroen C3 मध्ये मिळेल हाय लेव्हल कस्टमायझेशन…

| Updated on: Jun 06, 2022 | 5:44 PM

अपकमिंग कारमध्ये हाय लेव्हलचे कस्टमायझेशन उपलब्ध असणार आहे. युजर्स 21000 रुपयांमध्ये या नवीन कारची बुकिंग करता येणार आहेत. कंपनीच्या मते, अपकमिंग C3 कारला जबरदस्त कलर आणि एक्सेसरीजसह ग्राहकांच्या भेटीसाठी आणले जाणार आहे.

फ्रांसच्या कंपनीची पहिली मेड इन इंडिया कार... Citroen C3 मध्ये मिळेल हाय लेव्हल कस्टमायझेशन...
फ्रांसच्या कंपनीची पहिली मेड इन इंडिया कार...
Image Credit source: drivespark
Follow us on

फ्रांसची कार निर्माता (french automaker) सिट्रोन भारतीय ऑटोमोबाइल बाजारात आपली पहिली मेड इन इंडिया कार लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी सिट्रोन सी 3 (Citroen C3) कारला जुलैमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. अपकमिंग कारमध्ये हाय लेव्हलचे कस्टमायझेशन (high customization) उपलब्ध असणार आहे. युजर्स 21000 रुपयांमध्ये या कारची बुकिंग करु शकणार आहेत. कंपनीच्या मते, अपकमिंग C3 कारला जबरदस्त कलर आणि एक्सेसरीजसह ग्राहकांच्या भेटीसाठी आणले जाणार आहे. आपल्या पर्सनॅलिटीवर फोकस करणाऱ्या लोकांना ही कार मुख्य आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लेखातून C3 कारमध्ये युजर्सना काय स्पेसिफिकेशन्स मिळतील, त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

पहिली मेड इन इंडिया कार

सिट्रोनने भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये या आधी C5 एअरक्रॉसला बाजारात आणले होते. आता C3 सोबत फ्रेंच कार ब्रॅड भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. अपकमिंग कारला भारतामध्ये तयार करण्यात आले आहे. ही कार भारतीय युजर्स बेस कार असणार आहे. त्यामुळे या कारमध्ये हाय कस्टमायझेशन देण्यात आले आहे. भारतीय बाजारामध्ये नवीन C3 ची स्पर्धा टाटा पंच, मारुती सुझुकी इग्निस सारख्या कार्सशी होणार आहे.

 ‘हॅचबॅक विद ट्‌विस्ट’

सध्या भारतीय ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये एसयुव्हीचा ट्रेंड जोरात सुरु आहे. परंतु सिट्रोन आपल्या कारला एसयुव्ही सेगमेंटमध्ये आणणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एसयुव्ही सेगमेंटमध्ये प्रत्येक कार उत्पादक कंपनी आपले नशिब आजमावत आहे. असे असतानाही सिट्रोन या नवीन कारला ‘हॅचबॅक विद ट्‌विस्ट’ कारच्या स्वरुपात मार्केटमध्ये आणत आहे. कारच्या निर्मितीचे भांडवल कमी करण्यासाठी कंपनीने हॅचबॅक सेगमेंटअंतर्गत कमी भांडवल असलेली प्लेटफॉर्म आणि लोकलायझेशनला निवडले आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या केवळ पेट्रोल व्हेरिएंट

रिपोर्टसनुसार, नवीन C3 मध्ये युजर्सला केवळ 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळणार आहे. यात युजर्सना डिझेल इंजिन मिळणार नाही. यात 5 स्पीड मॅन्यूअल किंवा 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह मार्केटमध्ये येणार आहे. याच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास या कारची किंमत मारुती इग्निस आणि टाटा पंचच्या जवळपास असू शकते. या कारची स्पर्धा वरील गाड्यांसह देशातील कॉम्पॅक्ट एसयुव्हीशी होउ शकते.