AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हीरो मोटोकॉर्प कंपनीची 3 जुलैपासून टु व्हीलरच्या किंमतीत वाढ, सणासुदीच्या प्रारंभीच खिशाला बसणार कात्री

इनपुट खर्चात झालेल्या वाढीमुळे किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांआधीच दुचाकीच्या किंमतीत वाढ करण्यात आली असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. 

हीरो मोटोकॉर्प कंपनीची 3 जुलैपासून टु व्हीलरच्या किंमतीत वाढ, सणासुदीच्या प्रारंभीच खिशाला  बसणार कात्री
HERO BIKEImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 01, 2023 | 2:01 PM
Share

दिल्ली : जगातील सर्वात मोठी दुचाकी ( Two Wheeler Company ) निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्प ( Hero Motocorp ) हीने येत्या तीन जुलैपासून आपल्या मोटरसायकली आणि स्कूटरच्या एक्स-शोरुम ( Ex Showroom Price ) किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ जवळपास 1.5 टक्के असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच चाट पडणार आहे. हीरो मोटोकॉर्पने याच वर्षी एप्रिल महिन्यात OBD2 मानदंडात बदल केल्यानंतर दुचाकीच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कंपनीने दरवाढ घोषीत केल्याने वाढत्या महागाईत आणखीन फटका बसणार आहे.

सणासुदीच्या आधी वाढ 

हीरो मोटोकॉर्प कंपनीने एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मोटरसायकल आणि स्कूटरच्या किंमती होऊ घातलेली वाढ ही कंपनीच्या मूल्य समीक्षा धोरणाचा भाग आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की इनपुट खर्चात झालेल्या वाढीमुळे किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ऐन  सणासुदीच्या दिवसांआधीच दुचाकीच्या किंमतीत वाढ करण्यात आली असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.

 नवीन पॅशन प्लस लॉंच

अलिकडेच हीरो मोटोकॉर्प कंपनीने एंट्री लेव्हल कम्प्युटर सेगमेंटमध्ये पॅशन प्लस ही मोटरसायकल लॉंच केली आहे. त्याचवेळी कंपनीने Xtreme 160 4V ला आपल्या नवीन प्रिमियम कंम्प्युटर मोटरसायकलच्या रुपात सादर केले आहे. ही एक नवीन प्रिमियम बाईक आहे.

लवकरच नव्या बाईक लॉंच 

दुचाकी वाहन निर्माता कंपनी यावर्षी अनेक नवीन मॉडेलचे लॉंचिंग करणार आहे. यात काही बाईक अशा आहेत ज्यांची ग्राहकांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा आहे. या नवीन मॉडेलमध्ये करिझ्मा XMR 210 या बाईकचा देखील समावेश आहे. हीरो कंपनी निर्मित हार्ले-डेविडसन X440 सर्वात आधी लॉंच होणार आहे. दुचाकीच्या किंमतीत वाढ जाहीर होण्याच्या दिवशीच म्हणजे 3 जुलै रोजीच हीरो कंपनीची हार्ले डेविडसन बाईक लॉंच करण्यात येणार आहे.

Follow Us
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले