Hero च्या बाईक्स आणि स्कूटर्सवर तकडा डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफरसह इतक्या हजारांची सूट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 9:07 PM

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ज्या ऑटोमोबाईल कंपन्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले त्या कंपन्या पुन्हा एकदा चांगला नफा कमावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Hero च्या बाईक्स आणि स्कूटर्सवर तकडा डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफरसह इतक्या हजारांची सूट

मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ज्या ऑटोमोबाईल कंपन्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले त्या कंपन्या पुन्हा एकदा चांगला नफा कमावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 2020 च्या सणासुदीच्या काळात असेच काहीसे घडले होते, जेव्हा कंपन्यांनी वेगवेगळ्या सेल ऑफरद्वारे त्यांच्या विक्रीचे आकडे सुधारले होते. 2021 मध्ये सणांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी पुन्हा एकदा तयारी केली आहे. आज आम्ही ज्या कंपनीबद्दल सांगणार आहोत ती आहे हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp). या दुचाकी कंपनीने ‘मन में उत्सव छाए जब 10 करोड़ का भरोसा घर आए’ या टॅगलाईनने नवी मोहीम हाती घेतली आहे. (Hero motocorp giving strong offers on These bikes and scooters)

या काळात, कंपनी अनेक स्कूटर आणि दुचाकींवर एक्सचेंज ऑफर आणि लॉयल्टी बोनस देत आहे. याआधीदेखील कंपनीने अशीच ऑफर सादर केली होती, कारण कंपनीने बाजारात 10 वर्ष पूर्ण केली होती. तेव्हा कंपनीने ग्राहकांसाठी अनेक दमदार ऑफर्स सादर केल्या होत्या. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी अशा स्कूटर आणि बाईक्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्यावर तुम्हाला सूट मिळू शकते. तुमच्यासाठी इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी या ऑफर्स फक्त 2 दिवसांसाठी देत ​​आहे.

या बाईक्सवर डिस्काऊंट

या लिस्टमध्ये सूट मिळणाऱ्या मोटारसायकलींमध्ये 100cc, 125cc, 160cc आणि 200cc वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या जाहिरातीनुसार, येथे तुम्हाला 3000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि सर्व वाहनांवर 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. यादीत समाविष्ट वाहनांमध्ये स्प्लेंडर ismart BS6, एचएफ डिलक्स, स्प्लेंडर + बीएस 6, पॅशन प्रो, स्प्लेंडर+, सुपर स्प्लेंडर आणि एक्सट्रीम 160 आर यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता.

या स्कूटर्सवर डिस्काऊंट

स्कूटर्सवरही कंपनी 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे. या यादीतदेखील अनेक स्कूटर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात Pleasure+ BS6, डेस्टिनी 125, मायस्ट्रो एज 125, मायस्ट्रो एज 110 आणि नवीन मायस्ट्रो एज 125 यांचा समावेश आहे. उर्वरित माहिती तुम्ही वेबसाइटवर किंवा डीलरशिपवर फोन करून विचारू शकता.

या कंपनीची स्थापना 1984 मध्ये झाली होती, परंतु हिरो मोटोकॉर्प 2011 मध्ये जगासमोर आली. त्यामुळे आता कंपनी आपली 10 वी अॅनिव्हर्सरी साजरी करत आहे. जुलै 2011 मध्ये कंपनीची घोषणा करण्यात आली आणि नवीन लोगो ऑगस्ट 2011 मध्ये लाँच करण्यात आला होता.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Hero motocorp giving strong offers on These bikes and scooters)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI