बाजारात आली Hero ची जबरदस्त बाइक, फीचर्स पाहूनच ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी, किंमत फक्त…

Hero Xtreme 125R चे नवीन Stealth Edition लाँच. मिळणार कलर TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर. किती आहे किंमत? जाणून घ्या सविस्तर

बाजारात आली Hero ची जबरदस्त बाइक, फीचर्स पाहूनच ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी, किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 8:51 PM

Hero MotoCorp ने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय स्पोर्टी कम्यूटर बाइक Xtreme 125R चे नवीन आणि सर्वात प्रीमियम Stealth Edition लाँच केले आहे. या नव्या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.16 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आकर्षक डिझाइनसोबतच या बाइकला अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 125 सीसी सेगमेंटमध्ये प्रथमच या बाइकला कलर TFT डिस्प्ले आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी फीचर्स मिळत आहेत.

नवीन Xtreme 125R Stealth Edition ला ब्रॉन्झ आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबत लाल रंगाची कॉन्ट्रास्ट व्हील्स बाइकला अधिक आकर्षक लूक देतात. मागील पिलियन ग्रॅब रेल्स, फ्यूल टँक एक्स्टेंशन आणि बाइकवरील ‘X’ बॅजिंगवरही लाल रंगाच्या खास हायलाइट्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाइकचा स्पोर्टी आणि मस्क्युलर लूक अधिक उठून दिसतो.

Loading...

4.2 इंच कलर TFT डिस्प्ले आणि TPMS

या बाइकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात देण्यात आलेला 4.2 इंचाचा कलर TFT डिस्प्ले. हा डिस्प्ले Hero च्या मोठ्या बाइक्समध्येही पाहायला मिळतो. स्मार्टफोनला Hero च्या अ‍ॅपद्वारे कनेक्ट केल्यानंतर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि SMS अलर्ट्स तसेच म्युझिक कंट्रोल यांसारख्या सुविधा वापरता येतात.

याशिवाय यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देण्यात आली आहे. ही प्रणाली टायरमधील हवेच्या दाबावर लक्ष ठेवण्यास मदत करते. त्यामुळे प्रवासादरम्यान टायरच्या हवेबाबत माहिती मिळू शकते.

इंजिन आणि राइडिंग मोड्स

Hero Xtreme 125R Stealth Edition मध्ये 124,7 सीसी एअर-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 11. 4 HP पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाइकमध्ये Rain, Road आणि Sport असे तीन राइडिंग मोड्स मिळतात. रस्त्यांच्या परिस्थितीनुसार रायडरला हे मोड्स निवडता येतात. क्रूझ कंट्रोलबाबत कंपनीने या व्हेरिएंटसाठी स्वतंत्र अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोणत्या बाइक्सशी होणार स्पर्धा?

भारतीय बाजारात Hero Xtreme 125R Stealth Edition ची स्पर्धा TVS Raider आणि Honda CB125 Hornet यांसारख्या स्पोर्टी 125 सीसी बाइक्सशी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us