Honda City Hybrid : टाकी फूल करा अन् हजार किमीपर्यंत पळवा! Honda City हायब्रिड भारतात लाँच

| Updated on: May 04, 2022 | 7:24 PM

या कारमध्ये फॉर सिलेंडर एट्‌किनसन साइकल इंजीन देण्यात आले असून त्या माध्यमातून 98 पीएसची पॉवर आणि 127 एनएमचे टॉर्क जनरेट होउ शकणार आहेत. याच्या कॉम्बीनेशनमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली असून त्यानंतर ही कार 126 पीएसची पॉवर आणि 253 एनएमचे टॉर्कची निर्मिती करु शकणार आहे.

Honda City Hybrid : टाकी फूल करा अन् हजार किमीपर्यंत पळवा! Honda City हायब्रिड भारतात लाँच
Honda City Hybrid
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : होंडा सिटी हायब्रिडला (Honda City Hybrid) भारतात लाँच करण्यात आले आहे. याची अधिकृत किंमतही कंपनीकडून सांगण्यात आली आहे. होंडाच्या या हायब्रिड कारमध्ये ग्राहकांना एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 26 किलोमीटरपर्यंतचा मायलेज (Mileage) मिळू शकतो. होंडाच्या या कारला राजस्थानच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे. ही एक सेडन बॉडी टाइप कार आहे. होंडा सिटी हायब्रिड ई एचईव्हीची बुकींग सुरु करण्यात आली आहे. डीलर्सकडे जावून 21 हजार रुपयांमध्ये या कारची बुकींग करता येणार आहे. या लेखात कारच्या इतर स्पेसिफिकेशन्सची (Specifications) माहिती जाणून घेणार आहोत.

दरम्यान, होंडा सिटीच्या या हायब्रिड कारचे संपूर्ण नाव होंडा सिटी हायब्रिउ ई एचइव्ही असे आहे. कारची किंमत 19.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पेट्रोलच्या टॉप व्हेरिएंटच्या जवळपास साडेचार लाख रुपयांनी ही कार महाग आहे. आईसीई व्हर्जनच्या डिझाईनवर या कारची रचना ठेवण्यात आली आहे.

दोन मोटर्सचा समावेश

होंडाच्या दाव्यानुसार, त्यांची ही हायब्रिड कार 26.5 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते. ही कार पॉवरट्रेन ईसीव्हीटी ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससोबत उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. याचे लोकेशन कारच्या रिअर साइडवर फिट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

40 लीटर इंधनावर हजार किमीचा प्रवास

या कारमध्ये 40 लीटरचा फ्यूअल टँक उपलब्ध आहे. 40 लीटर इंधनावर ही गाडी जवळपास 1000 किमीचा प्रवास करेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. होंडाची ही कार तीन वर्षांच्या अनलिमिटेड वॉरंटीसह उपलब्ध असणार आहे. सोबतच यात, लिथिअम आयन बॅटरीवरही आठ वर्षांचा वॉरंटी देण्यात आली आहे.

असे असणार इंटीरिअर

या कारला अधिक आकर्षक बनविण्यासाठी कंपनीकडून विविध प्रयत्न करण्यात आले आहे. यात ड्युअल टोन इंटीरिअर देण्यात आले आहे. यात 8 इंचाचा टच स्क्रीन डिसप्ले देण्यात आला आहे. सोबतच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. ही कार सहा एअरबॅग्जसह उपलब्ध असणार आहे. यात, सनरुफ आणि इलेक्ट्रोनिक पार्किंग सेंसर विथ ऑटो होल्ड देण्यात आले आहेत.