Honda City : होंडासिटीच्या हायब्रिड वर्जनची तारीख ठरली! या गाडीच्या 7 खास गोष्टी जाणून घ्या

नवीन सिटी ई-एचईव्ही अनेक ॲडव्हान्स फिचर्ससह बाजारात दाखल होणार आहे. भारतात मास-मार्केट हायब्रिड कार होंडा सिटी ई एचईव्ही भारतातील पहिली मास मार्केट हायब्रिड कार असणार आहे. या कारच्या इतर फिचर्सबाबत जाणून घेणार आहोत.

Honda City : होंडासिटीच्या हायब्रिड वर्जनची तारीख ठरली! या गाडीच्या 7 खास गोष्टी जाणून घ्या
होंडा सिटीImage Credit source: Honda
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 11:18 AM

होंड कार (Honda Car) भारतात 4 मे रोजी आपली सर्वाधिक लोकप्रिय सेडन सिटी ई एचईव्हीला लाँच करण्याच्या तयारीत आहे. हायब्रिड सेडानने देशभरात आपली डिलरशिप सुरु केली आहे. या कारची मीडिया ड्राइव्हदेखील सुरु करण्यात आली आहे. नवीन होंडा सिटी ई एचईव्ही (Honda City E HEV) भारतात विविध ठिकाणी टेस्ट ड्राईव्हींगदरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. नवीन सीटी ई एचईव्ही नवीन ॲडव्हान्स फिचर्ससोबत बाजारात दाखल होत आहे. ही भारतातील पहिली मास-मार्केट हायब्रिड कार (Mass market hybrid car) असणार आहे. यासोबतच भारतात लोकल लेव्हलवर मॅन्यूफॅक्चर होणारी पहिली हायब्रिड कारदेखील असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Vinayak Patankar (@sidpatankar)

  1. या नवीन कारमध्ये किंचित स्टाइलिंग बदल असणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये नवीन होंडा सिटी ई एचईव्ही कारला काही युनिक स्टाइलिंग एलीमेंट्‌स मिळतात. होंडा लोगोमध्ये ब्लू हाइलाइट्‌स, नवीन फॉग लँप गार्निश, बुटवर डकटेल स्पॉइलर आणि रियर बंपरवर एक फॉक्स कार्बन फाईबर डिफ्यूजर मिळणार आहे.
  2. होंडा सिटी ई एचईव्ही केवळ एक ट्रिम लेव्हल टॉप-स्पेक झेडएक्समध्ये उपलब्ध होणार आहे. यात सामान्य सिटी झेडएक्स सारख्या सर्व सुविधा आणि सेफ्टी फिचर्स मिळणार आहेत.
  3. हायब्रिड पॉवरट्रेन पॉवरिंग, होंडाची नवी हायब्रिड सेडन एक 1.5 लीटर पेट्रोल इंजीन आहे. ज्यात लिथिअम-आयन बॅटरी आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्ससोबत जोडण्यात आले आहे. एक मोटर स्टार्टर-जनरेटरच्या स्वरुपात काम करते, तर दुसरी व्हील्सला पॉवर देण्याचे काम करते. सोबतच हे 126 पीएस पॉवर आउटपुट आणि 253 एनएम टार्क जनरेट करण्यासाठी रेट करण्यात आले आहे.
  4. होंडा सिटी ई एचईव्ही 26.5 किमी प्रतिलिटर चालत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा दावा तीन ड्रायव्हिंग मोड, ईवी मोड, हायब्रिड मोड आणि इंजीन मोडला समोर ठेवून करण्यात आला आहे.
  5. नवीन होंडा सिटी ई एचईव्हीमध्ये काही सेगमेंट फर्स्ट फिचर्समध्ये मिळत आहेत. हायब्रिड पॉवरट्रेन शिवाय या ठिकाणी काही दूसरे सेगमेंट फर्स्ट फिचर्स ऑफर केले गेले आहेत. यात, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, लेन वॉच कॅमेरा आदींचा समावेश आहे.
  6. मल्टीपल कनेक्टेड फिचर्स होंडा सिटी ई एचईव्हीवर कनेक्टेड कार टेकला सपोर्ट करेल. सोबत ॲमेझोन ॲलेक्सा आणि गुगल व्हाईस असिस्टेंटसाठी इनबिल्ट कॅम्पेबिलिटी देखील देण्यात येणार आहे.
  7. होंडा सिटी ई एचईव्हीला ॲडव्हान्स ड्राइवर असिस्टेंट फिचर्स मिळतात. ऑटोनोमस इमर्जंसी ब्रेकिंग सिस्टीमसोबत फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटो हाई बीम, लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर वॉर्निंग, ॲडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि ऑटो हाई बीमदेखील यात समाविष्ट आहेत.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.