AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होंडाची New CB200X बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

होंडा ने गुरुवारी नवीन एडीव्ही (New Honda CB200X) भारतीय बाजारात 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह लाँच केली आहे.

होंडाची New CB200X बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honda New CB200X
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 19, 2021 | 10:16 PM
Share

मुंबई : होंडा ने गुरुवारी नवीन एडीव्ही (New Honda CB200X) भारतीय बाजारात 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह लाँच केली आहे. नवीन मोटरसायकल हॉर्नेट 2.0 वर आधारित आहे आणि रोडस्टरकडून इंजिन आणि प्लॅटफॉर्म घेतलं आहे. नवीन ADV ला भारतीय बाजारात थेट प्रतिस्पर्धी नाही. ही बाईक ग्राहकांच्या खूप वेगळ्या समूहाला आकर्षित करते. ही बाईक Royal Enfield Himalayan आणि Hero XPulse 200 ADVs च्या रेंजमध्ये येते. (Honda’s most affordable ADV CB200X launched at Rs 1.44 lakh, check features)

Honda ADV च्या मध्यभागी 184 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे पॉवरट्रेन 17 एचपीची मॅक्सिमम पॉवर जनरेट करतं, तसेच 16 एनएम टॉर्क सपोर्टेड आहे. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. नवीन एडीव्हीचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल मीटर कन्सोल. यासंदर्भात, होंडा कंपनी दावा करते की, रायडिंग पोजिशनची पर्वा न करता चांगली व्हिजिबिलिटी देते. ही बाईक गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टमीटर सारखी माहिती 5-लेव्हल अॅडजस्टेबल ब्राइटनेससह प्रदान करते.

तरुणांना रायडिंगचा शानदार अनुभव मिळेल

नवीन एडीव्ही पर्ल नाईटस्टार ब्लॅक, मॅट सेलिन सिल्व्हर मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या तीन शानदार कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्शुशी ओगाटा यांनी सांगितले की, “आज, होंडाच्या जुन्या सीबी वारशाने प्रेरित नवीन मोटरसायकल सादर करताना मला आनंद होत आहे. भारतीय तरुणांची बदलती जीवनशैली लक्षात घेऊन, CB200X आजच्या तरुणांना एक रोमांचक रायडिंगचा अनुभव प्रदान करते, जी त्यांना अधिक अॅडव्हेंचरसाठी प्रेरित करते.

नव्या Honda CB200X मध्ये काय आहे खास?

नवीन होंडा CB200X मध्ये ऑल-एलईडी लायटिंग पॅकेज-पोजिशन लॅम्पसह एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेललॅम्प समाविष्ट आहेत. Winkers कव्हरमध्ये ठेवले आहेत. मोटरसायकल पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंजिन स्टॉप स्विच, हॅझर्ड स्विच, स्प्लिट सीट, अपस्वेप्ट एक्झॉस्ट, अंडर काउल आणि सिंगल-चॅनेल एबीएस यांचा समावेश आहे.

Honda CB200X ची बुकिंग आधीपासूनच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सुरु आहे. 2,000 रुपये भरून ग्राहक ही बाईक बुक करु शकतात. या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर 2021 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या

शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

(Honda’s most affordable ADV CB200X launched at Rs 1.44 lakh, check features)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?