शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर

जुलै महिन्यात टाटा मोटर्सने भारतीय बाजारात दोन अंकी हिस्सेदारी मिळवली आहे. भारतीय कार निर्मात्या कंपनीने नऊ वर्षांच्या कालावधीनंतर ही कामगिरी केली आहे.

शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:05 AM

मुंबई : जुलै महिन्यात टाटा मोटर्सने भारतीय बाजारात दोन अंकी हिस्सेदारी मिळवली आहे. भारतीय कार निर्मात्या कंपनीने नऊ वर्षांच्या कालावधीनंतर ही कामगिरी केली आहे. टाटा मोटर्सची गती कायम ठेवण्याची योजना आहे आणि त्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मागणीतील वाढीचा फायदा घेण्यासाठी कंपनी आपलं विक्री नेटवर्क वाढवण्याची तसेच नवीन वाहने सादर करण्याची योजना आखत आहे. (Tata Motors will launch new micro SUV Hornbill soon, know more)

एका अहवालानुसार, टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात दोन नवीन वाहने बाजारात आणण्याची योजना आखली आहे आणि यात बहुप्रतिक्षित हॉर्नबिलचा (Hornbill) समावेश आहे, जी नियमित हॅचबॅकपेक्षा थोडी मोठी म्हणजेच मायक्रो एसयूव्ही असेल. कोडनेम HBX सह टाटा हॉर्नबिल (Tata Hornbill) पहिल्यांदा 2019 जिनेव्हा मोटर शो दरम्यान पाहायला मिळाली होती.

या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची किंमत. ही कार अवघ्या 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या किंमतीत भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या कारचे काही फीचर्स हे टाटाच्याच नेक्सॉनप्रमाणे असतील. परंतु या कारचा प्रिमियम लुक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल, यात शंका नाही.

कधी होणार लाँच

कंपनीने म्हटलं आहे की, जी कार लाँच होणार आहे त्या कारचं 90 टक्के डिझाईन हे एक्सपोमध्ये दाखवण्यात आलेल्या कारप्रमाणेच असेल. टाटा HBX केवळ एका कॉन्सेप्टचं नाव आहे, परंतु ही गाडी टाटा हॉर्नबिल या नावाने सादर केली जाऊ शकते. Tata HBX तिचे प्रतिस्पर्धी Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis ला टक्कर देणार आहे.

जबरदस्त इंजिन

एचबीएक्स ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे धावेल, हे इंजिन टाटाच्या अल्ट्रॉझ या कारमध्ये देण्यात आलं आहे. हे इंजिन 6000rpm वर 84bhp पॉवर तर 3300rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करु शकेल. ही गाडी 5 स्पीड मॅनुअल आणि एएमटीसह सादर केली जाऊ शकते. Tata HBX ही कार लोकप्रिय ठरली तर Tata या कारसह Altroz चं टर्बो पेट्रोल इंजिनही लाँच करु शकते.

इतर बातम्या

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(Tata Motors will launch new micro SUV Hornbill soon, know more)

Non Stop LIVE Update
पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात
पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात.
पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस... देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल
पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस... देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल.
डोंबिवली स्फोट प्रकरणी उद्योगमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण आदेश, म्हणाले...
डोंबिवली स्फोट प्रकरणी उद्योगमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण आदेश, म्हणाले....
कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? शिरसाटांनी म्हटल..
कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका काय? शिरसाटांनी म्हटल...
पुणे अपघातावर सुप्रिया सुळेंच मौन, अग्रवालशी संबंध? भाजप नेत्याचा आरोप
पुणे अपघातावर सुप्रिया सुळेंच मौन, अग्रवालशी संबंध? भाजप नेत्याचा आरोप.
डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट; काचांचा खच अन परिसरात धुराचे मोठाे लोट
डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट; काचांचा खच अन परिसरात धुराचे मोठाे लोट.
चूक केली... पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली
चूक केली... पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली.
जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा..., रोहित पवारांच हजारेंना प्रत्युत्तर
जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा..., रोहित पवारांच हजारेंना प्रत्युत्तर.
पुणे अपघातावर वसंत मोरे म्हणाले, पुण्याच्या नेत्यांची कीव येते कारण...
पुणे अपघातावर वसंत मोरे म्हणाले, पुण्याच्या नेत्यांची कीव येते कारण....
काका कमळ फूल 3 नंबरचं बटण, एका मतासाठी 500 रूपये व्हिडीओ होतोय व्हायरल
काका कमळ फूल 3 नंबरचं बटण, एका मतासाठी 500 रूपये व्हिडीओ होतोय व्हायरल.