मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

मारुती व्यतिरिक्त, ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस, सॅन्ट्रो आणि ऑराला (Hyundai Grand i10 Nios, Santro, Aura) फॅक्टरी फिट सीएनजी पर्यायासह ऑफर करते. स्विफ्ट सीएनजीची स्पर्धा ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस सीएनजीशी असेल. तसेच डिझायर सीएनजीची स्पर्धा ह्युंडाई ऑरा सीएनजीशी असेल.

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा
मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : तुम्हाला माहितच असेल की मारुती कंपनी सध्या आपल्या आगामी सुझुकी डिझायर आणि स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिएंटवर काम करीत आहे. दोन्ही गाड्या देशातील रस्त्यांवर एका चाचणीदरम्यान दिसल्या आहेत. आता दोन्ही गाड्यांचे इंजिन पॉवर आउटपुट ऑनलाईन लीक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर car.spyshots ही चित्रे शेअर करण्यात आली आहेत. लीक झालेल्या स्पेक्सने आपण पाहू शकतो की दोन्ही गाड्या 1.2 लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरतात, जे जास्तीत जास्त 81 बीएचपीची पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क उत्पन्न करते. सीएनजीवर चालताना पॉवर आउटपुट कमी होऊन 70 बीएचपी आणि टॉर्क आउटपुट 95 एनएमपर्यंत जाईल. (These are the special features of Maruti Swift and Dzire’s CNG models)

हे तेच इंजिन आहे जे यापूर्वी दोन्ही गाड्यांमध्ये सादर करण्यात आले होते. आता या इंजिनची जागा अधिक शक्तिशाली आणि अधिक कार्यक्षम ड्युअलजेट इंजिनने घेतली आहे. यामध्ये 1.2 लिटर डिस्प्लेसमेंटदेखील मिळते. नवीन इंजिन 89 बीएचपीची जास्तीत जास्त शक्ती निर्माण करते तर टॉर्क आउटपुट 113 एनएमवर राहते.

कॉस्मेटिकदृष्ट्या कोणतीही बदल नाही

कॉस्मेटिकदृष्ट्या दोन्ही वाहनांमध्ये इतर कोणतेही बदल केले जाणार नाहीत. तसेच मारुती सुझुकी सीएनजी व्हेरिएंटसह एएमटी ट्रान्समिशन ऑफर करण्याची शक्यता फार कमी आहे. या प्रकरणात आपल्याला फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. हे ऑटो स्टार्ट/स्टॉप फिचरसह येईल, याची इंधन वाचवण्यास मोठी मदत होईल.

सीएनजी व्हेरिएंट लोकांसाठी ठरतील फायदेशीर

स्विफ्ट आणि डिझायर ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात इंधन कार्यक्षम वाहने आहेत, जी तुम्ही खरेदी करू शकता. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही सीएनजी व्हेरिएंट लोकांसाठी फायदेशीर करार ठरू शकतात. फॅक्टरी फिट सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे. कारण ग्राहकाकडे वॉरंटी आहे आणि त्याची किंमत पेट्रोलपेक्षा खूपच कमी आहे.

डिझायर सीएनजीची ह्युंडाई ऑरा सीएनजीशी असेल स्पर्धा

मारुती व्यतिरिक्त, ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस, सॅन्ट्रो आणि ऑराला (Hyundai Grand i10 Nios, Santro, Aura) फॅक्टरी फिट सीएनजी पर्यायासह ऑफर करते. स्विफ्ट सीएनजीची स्पर्धा ह्युंडाई ग्रँड आय 10 निओस सीएनजीशी असेल. तसेच डिझायर सीएनजीची स्पर्धा ह्युंडाई ऑरा सीएनजीशी असेल. टाटा मोटर्स कंपनी आपल्या टियागो आणि टिगोरच्या सीएनजी व्हेरिएंटची सध्या चाचणी घेत आहे. हे नवे व्हेरिएंट देखील लवकरच मार्केटमध्ये लॉन्च केले जातील आणि ते डिझायर आणि स्विफ्टशी स्पर्धा करतील. होंडा अमेझचा सीएनजी व्हेरिएंटदेखील तयार करत आहे, असेही वृत्त आहे. (These are the special features of Maruti Swift and Dzire’s CNG models)

इतर बातम्या

आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?

बिल्डरने खोदलेल्या खड्ड्यात पोहोण्यासाठी मुलांची उडी, पाण्याचा अंदाज न आल्याने अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI