नवा लूक, किंमतही कमी, लवकरच बाजार येणार 3 गाड्या, जाणून घ्या फिचर्स
घटत्या विक्रीशी झगडत असलेली ह्युंदाई लवकरच 3 नवीन वाहने भारतीय बाजारात लाँच करू शकते. ह्युंदाई 3 कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनवर काम करत आहे. हे मॉडेल्स लवकरच बाजारात लाँच केले जाऊ शकतात.

तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर थोडं थांबा. कारण, ह्युंदाई लवकरच 3 नवीन वाहने भारतीय बाजारात लाँच करू शकते. त्यामुळे घाई करू नका, तुम्हाला अपडेटेड फीचर्ससह अनेक गोष्टी या 3 नवीन वाहनांमध्ये मिळू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
भारतीय वाहन बाजारात ह्युंदाईची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून काही खास राहिलेली नाही. दीर्घकाळापासून देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी असलेल्या ह्युंदाईला मे 2025 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर यावे लागले होते. कंपनीच्या बहुतांश कार आता कमी विकल्या जात आहेत. क्रेटा एसयूव्ही ही एकमेव अशी आहे जी चांगली कामगिरी करत आहे. ह्युंदाईला येत्या काही महिन्यांत लाँच होणाऱ्या आपल्या तीन नव्या कारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
1. न्यू जनरेशन ह्युंदाई वेन्यू
ह्युंदाई ऑक्टोबर 2025 च्या आसपास भारतात नवीन व्हेन्यू एसयूव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. याची झलक नुकतीच टेस्टदरम्यान पाहायला मिळाली. डिझाइनमध्ये मोठा बदल होणार आहे जो मुख्यतः क्रेटापासून प्रेरित असेल. नव्या वेन्यूमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, नवीन 16 इंचाची अलॉय व्हील्स आणि चारही चाकांवर डिस्क ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी यात लेव्हल 2 एडीएएस तंत्रज्ञान देण्यात येणार आहे, तर सध्याच्या मॉडेलमध्ये फक्त लेव्हल 1 एडीएएस आहे. यात सध्याच्या मॉडेलमध्ये जे पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिले जाते, तेच मिळणार आहे.
2. ह्युंदाई आयनिक 5 फेसलिफ्ट
आयनिक 5 ही एक इलेक्ट्रिक कार आहे, जी दोन वर्षांपूर्वी भारतात लाँच करण्यात आली होती. आता याचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. या कारमध्ये नवीन डिझाइन, अधिक फिजिकल बटन आणि नवीन 3-स्पोक स्टीअरिंग व्हील मिळेल. यात 84 किलोवॅटची मोठी बॅटरी असेल, जी सिंगल फुल चार्जवर 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल. याशिवाय यात 8 एअरबॅग, लेव्हल 2 एडीएएस, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट आणि डिजिटल की सारखे फीचर्स मिळतील. नुकतीच ही कार भारतात टेस्टिंग दरम्यान पाहायला मिळाली आहे.
3. ह्युंदाई वरना फेसलिफ्ट
ह्युंदाई आपल्या वेर्ना सेडानचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील आणणार आहे. तसेच 2025 च्या अखेरीस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल करण्यात येणार आहेत, विशेषत: त्याच्या फ्रंट फॅसियामध्ये. याचे इंटिरियरही नवीन आणि अॅडव्हान्स फीचर्ससह अपडेट केले जाणार आहे. इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.
