केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

| Updated on: Mar 21, 2021 | 7:12 AM

कबिरा मोबिलिटीने (Kabira Mobility) दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक KM3000 आणि KM4000 गेल्या महिन्यात लाँच केल्या होत्या.

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री
Follow us on

मुंबई : कबिरा मोबिलिटीने (Kabira Mobility) दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक KM3000 आणि KM4000 गेल्या महिन्यात लाँच केल्या होत्या. ग्राहकांना जबरदस्त अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने या दोन मेड इन इंडिया बाईक सादर करण्यात आल्या. तसेच या बाईक पर्यावरणास अनुकूल असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (Kabira Mobility’s KM3000, KM4000 electric bikes got 6,000+ bookings in 4 days)

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, कबीरा मोबिलिटीच्या बाईक्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. KM 3000 आणि KM 4000 या दोन इलेक्ट्रिक बाइक्स बुकिंगसाठी उपलब्ध केल्यानंतर अवघ्या चार दिवसात कंपनीने या बाईक्सच्या 6,000 यूनिट्ससाठी बुकिंग्स मिळवल्या आहेत.

कबिरा मोबिलिटीने या दोन्ही बाईक्ससाठी आकर्षक किंमती ठेवल्या आहेत. KM3000, या बाईकची पीक पॉवर 6000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,26,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे, तर KM4000 या बाईकची पीक पॉवर 8000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,36,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे.

या मोटारसायकल्सची डिलीव्हरी मे-2021 पासून सुरु केली जाणार आहे. कबिरा मोबिलिटी या बाईक्ससाठी 20 फेब्रुवारीपासून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, गोवा आणि धारवाडसारख्या शहरांमध्ये या बाईकचा सेल सुरु केला आहे. दोन्ही बाईक्स कबिरा मोबिलिटीच्या वेबसाईटवरुन बुक करता येतील.

टॉप स्पीड 150KM

KM3000 या बाईकचं टॉप स्पीड 100KMPH इतकं आहे तर या बाईकची रेंज 120KM पर्यंत आहे. KM4000 या बाईकचं टॉप स्पीड 120KMPH आणि रेंज 150KM इतकी आहे. KM3000 या बाईकचं वजन 138 किलोग्रॅम इतकं आहे. या बाईकला ‘स्पोर्ट्स बाइक’ लुक देण्यात आला आहे. तर KM4000 या बाईकचं वजन 147 किलोग्रॅम इतकं असून ही बाईक ‘नेक्ड बाइक’ डिझाईनमध्ये सादर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

तुमची कार आता HP च्या पेट्रोल पंपावर होणार चार्ज, देशभरात EV नेटवर्क तयार

30 मिनिटात चार्ज, सिंगल चार्जवर 130KM धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक बाजारात, अवघ्या 1999 रुपयांत बुक करा

(Kabira Mobility’s KM3000, KM4000 electric bikes got 6,000+ bookings in 4 days)