AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Brezza आणि Tata Nexonला टक्कर देणारी Kia Syros कार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कियाची नवी एसयूव्ही 'सिरोस' लाँच झाली आहे. ही कार लाँच होताच त्याची थेट टक्कर टाटा नेक्सॉन आणि मारुती सुझुकी ब्रेझा सारख्या बेस्ट सेलिंग एसयूव्हीशी होणार आहे. जाणून घेऊया सिरोसच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल.

Maruti Brezza आणि Tata Nexonला टक्कर देणारी Kia Syros कार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Kia Syros
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:03 PM
Share

भारतीय बाजरपेठेत अनेक कार आणि स्कुटर लाँच होत असतात. त्यातच आज दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी कियाने आज आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही किआ सायरोस अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केली. ही कार एक बी-सेगमेंट एसयूव्ही आहे जी सेल्टोस आणि सोनेट दरम्यान पोझिशन करेल. कियाची भारतातील ही पाचवी एसयूव्ही असून ती खास डिझाइन करण्यात आली आहे. तर किआ इंडिया या कारला ‘SUV नवीन स्पीशीज’ म्हणत आहे कारण या कारचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये इतर एसयूव्हीपेक्षा वेगळी आहेत. भारतीय बाजारात या कारची टक्कर टाटा नेक्सॉन आणि मारुती सुझुकी ब्रेझा यांच्याशी होणार आहे.

Kia Syrosचे डिझाइन

Kia Syros या कारचे डिझाइन तुम्ही पाहिलात तर इतर एसयूव्हीपेक्षा थोडी वेगळी आहे. तसेच या कारच्या लूकमध्ये एक नवीन आणि वेगळी स्टाईल आहे, जी इतर एसयूव्हीपेक्षा वेगळी असेल. यात तुम्हाला RV सारख्या डिझाइन पाहायला मिळतील. कियाची ही पहिली एसयूव्ही आहे, जी कंपनीच्या नवीन डिझाइन 2.0 फिलॉसॉफीअंतर्गत तयार करण्यात आली आहे.

Kia Syros फीचर्स

या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि पॅनोरॅमिक सनरूफ हे फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी आयसोफिक्स चाइल्ड सीट माऊंट आणि एडीएएस (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) अशी सुरक्षेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

Kia Syros स्पेसिफिकेशन्स

किआ सिरोसमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळणार आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल व्हेरियंटमध्ये 1.5 लीटर इंजिनची पॉवर मिळेल. तसेच या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय आहे.

Kia Syrosस्पर्धा

भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आलेल्या किआ सायरोसची टक्कर मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा एक्सयूव्ही 300, ह्युंदाई व्हेन्यू सारख्या एसयूव्हीशी होणार आहे. नवीन एसयूव्ही किआ सोनेट आणि सेल्टोस दरम्यानच्या रेंजमध्ये लाँच केली आहे. ‘सिरोस’च्या माध्यमातून कियाची नजर अशा ग्राहकांवर आहे, जे सोनेटपेक्षा एसयूव्ही खरेदीवर जास्त पैसे खर्च करू शकतात.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.