
आपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण कितीदा तरी ऐकली आहे. पण एका मोपेडने रेल्वेला धोबीपछाड दिली हा किस्सा कदाचित तुमच्या कानावर कधी आला नसेल. काहींनी तो वाचला पण नसेल. तर काही जण कदाचित त्याचे साक्षीदार असतील. सोशल मीडियावर सहज नजर फिरवली तर काहींच्या लेखणीतून हा किस्सा चितरला आहे. कायनेटिक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांनी त्यांच्या LinkedIn वर याविषयीची एक आठवण शेअर केली होती. ती पुन्हा समोर आली. एका साध्या मोपेडने डेक्कन क्वीन या रेल्वेला कशी धोबीपछाड दिली असेल याचे जितके कौतुक तितकचं या किस्साविषयी इंटरनेटच्या मायाजालात डोकावलो तर बरेच धागेदोरे मिळाले. काय आहे किस्सा, कशी दाखवली लुना मोपेडने कमाल? अहमदनगर येथून श्रीगणेशा ...