AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : फलंदाज की गोलंदाज! ईडन गार्डन्सची खेळपट्टी कोणाला मदत करणार? पिच रिपोर्टने फुटला घाम

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील हायव्होल्टेज सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. या सामन्याचं महत्त्व वाढण्याचं कारणच तसं आहे. विजेत्या संघ्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे करो या मरोची लढाई आहे. असं असताना खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

IND vs WI : फलंदाज की गोलंदाज! ईडन गार्डन्सची खेळपट्टी कोणाला मदत करणार? पिच रिपोर्टने फुटला घाम
IND vs WI : फलंदाज की गोलंदाज! ईडन गार्डन्सची खेळपट्टी कोणाला मदत करणार? पिच रिपोर्टने फुटला घामImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 28, 2026 | 6:07 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल तर दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याची रंगत आतापासूनच वाढली आहे. विजयाचं गणित सोडवायचं असेल तर खेळपट्टीचा अंदाज असणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण खेळपट्टी बरंच काही ठरवणार आहे. ईडन गार्डन्सवरची खेळपट्टी अनेकदा गोलंदाजांना अनुकूल असते. तर कधी फलंदाजांनाही मदत करते. त्यामुळे अंदाज बांधणं कठीण होते. त्यामुळे भारतीय संघाला खेळपट्टीचा योग्य तो अंदाज घेऊन प्लेइंग 11 ठरवावी लागणार आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचे फोटो समोर आले आहे. यावरून या खेळपट्टीचा अंदाज क्रीडातज्ज्ञ बांधत आहेत. या अंदाजावर नाणेफेकीचा कौल जिंकला तर काय करायचं हे ठरवलं जाईल.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी कोणाला मदत करेल?

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचे फोटो पाहता फलंदाजांची चांदी आहे. फलंदाजांना मदत मिळेल अशी खेळपट्टी क्युरेटर्सने तयार केली आहे. यामुळे चेंडू सहज बॅटवर येईल. त्यामुळे भारत वेस्ट इंडिज सामन्यात खोऱ्याने धावा झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. सुरूवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. म्हणजेच या खेळपट्टीचं एकंदरीत आकलन करायचं फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण भारतीय फलंदाजी फिरकीपुढे नांगी टाकत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या सामन्यात काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागणार आहे.

ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी पाहता भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये काही बदल करेल असं वाटत नाही. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला संघच यावेळी मैदानात उतरू शकतो. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील. तर इशान किशन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. मधल्या फळीत इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे खेळतील. तर अक्षऱ पटेल आणि वरूण चक्रवर्तीवर फिरकीची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ