नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

| Updated on: Feb 13, 2021 | 9:24 PM

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी ऑल-न्यू स्कॉर्पियोच्या (All New Scorpio) लाँचिंगसाठी जोरदार तयारी करत आहे.

नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात
Follow us on

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी ऑल-न्यू स्कॉर्पियोच्या (All New Scorpio) लाँचिंगसाठी जोरदार तयारी करत आहे. महिंद्राची ही बहुप्रतीक्षित कार जून 2021 च्या आसपास लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या Scorpio चे फोटो पाहून लक्षात येईल की, ही कार जुन्हा Scorpio पेक्षा थोडी मोठी आणि बोल्ड असेल. (Mahindra affordable Scorpio may be launched before June 2021 company working on new generation model)

ऑल-न्यू स्कॉर्पियो या कारमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. आगामी स्कॉर्पियो नवीन लॅडर-फ्रेम चेसीवर आधारित असेल. या कारच्या लीक झालेल्या फोटोवरुन अंदाज बांधला जातोय की, आगामी स्कॉर्पियोमध्ये सध्याच्या स्कॉर्पियोच्या तुलनेत मोठं फुटप्रिंट असेल, हे नवीन फ्रंट ग्रिलने लेस असेल. यामध्ये वर्टिकल स्लॅट्ससह मध्यभागी कंपनीचा लोगो असेल.

स्कॉर्पियोच्या नवीन हेडलॅम्प्सना रीमॉडेल्ड ट्विन-पॉड हेडलॅम्प्सद्वारे फ्लँक केले जातील. बोनेट थोडं लांब असेल आणि एक नवीन फ्रंट बम्परही दिलं जाईल. मागच्या बाजूचं टेलगेटही मोठं असेल. एलईडी टेललाइट्स आणि रूफ-माउंटेड स्टॉप लँपसह येईल. असं म्हटलं जातंय की कंपनी ही कार 12 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करु शकते. ही या लाईनअपमधील सर्वात स्वस्त कार असेल.

महिंद्राची नेक्स्ट जनरेशन New Scorpio ही गाडी ZEN3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नव्या महिंद्रा स्कॉर्पियोच्या नव्या डिझाईनमध्ये, ज्यादा जागा, नवा इंटेरियर लूक आणि लांब व्हीलबेसच्या सह लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रांन्समिशन सुविधा उपलब्ध असेल.

स्कॉर्पियोचं अपडेटेड मॉडलसुद्धा आधी प्रमाणे 7 स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेट्स सोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5 स्पोक 17 इंच अलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्स सोबत आउट साइट रियर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेन्स एलईडी टेल लॅम्प्स सोबत येते.

महिंद्रा स्कॉर्पियो मध्ये BS6 कम्प्लायंट 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन मिळणार आहे. जे 138bhp चे पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. एस 5 व्हेरियंटमध्ये या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्यूअल, तर अन्य व्हेरियंट सोबत 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स मिळणार आहे. बीएस 6 मॉडल मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन दिले नाही.

हेही वाचा

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

टेस्लाकडून मॉडेल वाय लाँच; जाणून घ्या, ‘या’ इलेक्ट्रिक वाहनाची किंमत अन् फीचर्स

Nissan Kicks वर मिळतोय चक्क 95 हजार रुपयांचा डिस्काऊंट, जबरदस्त आहे फीचर

(Mahindra affordable Scorpio may be launched before June 2021 company working on new generation model)