AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना पेट्रोल, ना डिझेलच टेंशन, आजच बुक करा ही कार, लूक आणि फीचर्स पाहून प्रेमात पडाल, किंमत फक्त….

कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेल्या कारच्या बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे.

ना पेट्रोल, ना डिझेलच टेंशन, आजच बुक करा ही कार, लूक आणि फीचर्स पाहून प्रेमात पडाल, किंमत फक्त....
Image Credit source: Social media
soneshwar.patil
soneshwar.patil | Updated on: Jan 14, 2026 | 6:13 PM
Share

भारतात एकापेक्षा एक कार आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्यामधील फीचर्स आणि मायलेज पाहून अनेकांना कोणती कार घ्यावी हे ठरवणे अवघड होत चाललं आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत जी नोव्हेंबर 2025 मध्ये लॉन्च झाली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टप्पा गाठत आपली नवी इलेक्ट्रिक 7-सीटर SUV Mahindra XEV 9S नोव्हेंबरमध्ये लॉन्च केली होती. ही SUV नुकत्याच सादर झालेल्या XUV 7XO ची इलेक्ट्रिक आवृत्ती असून तिची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतातील पहिली इलेक्ट्रिक 7-सीटर SUV म्हणून XEV 9S कडे पाहिले जात आहे.

कंपनीने SUV लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तिच्या बुकिंगची घोषणा केली आहे. आज 14 जानेवारी 2026 पासून XEV 9S चे बुकिंग सुरू होत असून 23 जानेवारी 2026 पासून ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे.

दमदार बॅटरी आणि परफॉर्मन्स

महिंद्रा XEV 9S ही कंपनीच्या अत्याधुनिक INGLO आर्किटेक्चर वर आधारित कार आहे. या इलेक्ट्रिक SUV कारमध्ये तीन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. ज्यामध्ये या कारचा पॉवरफुल बॅटरी सेटअप XEV 9S ला परफॉर्मन्स आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही कार सक्षम आहे.

डिझाइनच्या बाबतीत बोलायचं झालं तर XEV 9S ला आधुनिक, इलेक्ट्रिक लुक देण्यात आला आहे. यामध्ये एल-आकाराचे LED DRLs, हेडलॅम्प्स, फ्रंटला आकर्षक LED लाइट बार, याशिवाय फ्लश डोअर हँडल्स, एअरो-स्टाइल अलॉय व्हील्स, रूफ रेल्स, शार्क-फिन अँटेना आणि समोर-मागे महिंद्रा इलेक्ट्रिक लोगो SUV च्या लुकला प्रीमियम टच देताना दिसत आहे.

आरामासाठी अनेक लक्झरी फीचर्स

XEV 9S मध्ये प्रवाशांच्या आरामासाठी अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये पावर्ड बॉस मोड, रिक्लाइन आणि स्लाइडिंग अ‍ॅडजस्टमेंट, वेंटिलेटेड सेकंड-रो सीट्स आणि सनशेड. त्यासोबत वायरलेस फोन चार्जिंग, तीन अ‍ॅम्बिएंट मोड्ससह LiveYourMood इंटरफेस, BYOD (Bring Your Own Device) सपोर्ट आणि ट्रान्सलुसंट डोअर इन्सर्ट्स केबिनला फ्युचरिस्टिक लुक देते. त्यामुळे जर तुम्हाला ही कार घेयची असेल तर तुम्हाला आज ती बुकिंग करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही कार 23 जानेवारी रोजी मिळेल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.