
मारुती सुझुकी सेलेरियो ही नेहमीच भारतात विकली जाणारी सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार आहे. नवीन Celerio 26.68 kmplचे मायलेज देते. Celerio ही सध्या भारतातील सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम पेट्रोल कार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला Renault Indiaने अपडेट केलेले 2021 मॉडेल वर्ष (MY) Kwid सादर केले. कारचे अपडेट्स केवळ कॉस्मेटिक असले तरी, रेनॉल्ट क्विड ही एंट्री-लेव्हल स्पेसमधील सर्वात इंधन-कार्यक्षम पेट्रोल कार आहे. कारचे 1.0-लिटर AMT प्रकार 22 kmplचे मायलेज देते.

नवीन-जनरेशन स्विफ्ट 2018मध्ये लॉन्च करण्यात आली होती, या वर्षाच्या सुरुवातीला मारुती सुझुकीने कारचे फेसलिफ्ट व्हेरियंट लॉन्च केले होते. हा कॉम्पॅक्ट हॅचबॅक 23.76 kmplचे मायलेज देतो.

2021 रेनॉल्ट किगर ही रेनॉल्टची पहिली सबकॉम्पॅक्ट SUV आहे. किगर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर केले आहे - एक 1.0-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड मोटर आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. कार 20.53 kmplपर्यंत मायलेज देते.

टाटा पंच - या वर्षी भारतात विक्रीसाठी आलेल्या उत्तम कारपैकी एक आहे. ही गाडी स्मार्ट फीचर्ससह येते आणि त्याला ग्लोबल NCAPकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. त्याचे मायलेज 18.97 kmpl आहे.