AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Dzire बनली भारतातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान

Maruti Dzire Top Selling Sedan Car in India: मारुती सुझुकी इंडियाची एंट्री लेव्हल सेडान कार मारुती सुझुकी इंडियाने नवा विक्रम केला आहे. 17 वर्षांपूर्वी ही कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात आली होती. मारुती 800, मारुती ऑल्टो, मारुती वॅगनआर आणि मारुती स्विफ्ट सारख्या मारुतीच्या इतर गाड्यांप्रमाणेच या कारने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

Maruti Dzire बनली भारतातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान
Maruti Dzire Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 12:46 PM
Share

Maruti Dzire Top Selling Sedan Car in India: मारुती सुझुकी इंडियाने यावर्षी आपल्या एंट्री लेव्हल सेडान कार मारुती डिझायरचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल लाँच केले आहे. पण 17 वर्षांपूर्वी जेव्हा ही कार बाजारात आली, तेव्हापासून ती लोकांच्या पसंतीस आहे.

मारुती 800, मारुती ऑल्टो, मारुती वॅगनआर आणि मारुती स्विफ्ट सारख्या मारुतीच्या इतर गाड्यांप्रमाणेच या कारने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे आणि आता एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

मारुती डिझायर लाँच झाल्यापासून कारखान्यात एकूण 30 लाख युनिट्सची निर्मिती झाली आहे. देशातील कोणत्याही सेडान कारच्या उत्पादनाचा हा विक्रम आहे. मारुती डिझायर 2008 मध्ये लाँच करण्यात आली होती.

मारुती डिझायरने कधी केले विक्रम?

मारुती डिझायरने लाँचिंगनंतर अवघ्या काही वर्षांनी 2015 मध्ये 10 लाख कारचे विक्रमी उत्पादन केले होते. त्यानंतर अवघ्या 4 वर्षात त्याची मागणी इतकी वाढली की 2019 मध्ये हा आकडा दुप्पट झाला. 2019 पर्यंत मारुती डिझायरच्या 20 लाख कारचे उत्पादन झाले होते.

आता कंपनीने पुन्हा 5 वर्षांत 10 लाख डिझायरचे उत्पादन केले आहे. मध्यंतरी बराच काळ कोव्हिडमुळे गाड्यांची योग्य विक्री झाली नाही तेव्हा हा प्रकार घडला आहे.

मारुती सुझुकी डिझायरची 48 देशांमध्ये विक्री

मारुती डिझायर केवळ भारतातच नाही तर परदेशातही आवडते. सुमारे 48 देशांमध्ये याला मागणी आहे. यात लॅटिन अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियातील देशांचा समावेश आहे.

मारुती सुझुकीची ही दुसरी सर्वाधिक निर्यात होणारी कार मॉडेल आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या चौथ्या जनरेशन डिझायरमध्ये झेप घेतली आहे. क्रॅश टेस्टमध्ये कंपनीच्या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

तुम्हाला माहिती आहे का की, मारुती डिझायरने लाँचिंगनंतर अवघ्या काही वर्षांनी एक विक्रम केला होता. मारुती डिझायरने 2015 मध्ये 10 लाख कारचे विक्रमी उत्पादन केले होते. त्यानंतर अवघ्या 4 वर्षात त्याची मागणी इतकी वाढली की 2019 मध्ये हा आकडा दुप्पट झाला होता. हे खरंच विश्वास बसणार नाही पण सत्य आहे. इतकी मागणी या कारची वाढली आहे. 2019 पर्यंत मारुती डिझायरच्या 20 लाख कारचे उत्पादन झाले होते. ही देखील आकडेवारी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना