Jimny खरेदीसाठी मारुती शोरूममध्ये गर्दी, लोकांचा ओढा का? जाणून घ्या

Maruti Jimny: तुम्हाला Jimny चे सर्वात स्वस्त मॉडेल खरेदी करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत, कारण ही मार्केटमधील ट्रेंडिंग एसयूव्ही आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घ्या.

Jimny खरेदीसाठी मारुती शोरूममध्ये गर्दी, लोकांचा ओढा का? जाणून घ्या
jimmy
Image Credit source: gogle
| Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 2:46 PM

Maruti Jimny : भारतीय कार मार्केटमध्ये मारुती सुझुकी जिमनीची वेगळी भूमिका आहे. ऑफ रोड कॅटेगरीत याला चांगलीच पसंती मिळत आहे. खरं तर हे कॉम्पॅक्ट आहे आणि ड्रायव्हिंगही खूप सोपं आहे. भारतात जिमनीचे 5 डोअर व्हर्जन आहे, तर जागतिक बाजारात त्याचे 3 डोअर व्हर्जन उपलब्ध होते. मारुती जुमनीच्या फुल लोडेड अल्फा ट्रिमवर एप्रिल 2025 मध्ये 70,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळतो. लोअर स्पेक झेटा व्हेरियंटला या महिन्यात कोणतीही ऑफर मिळत नाही.

ही मिड-रेंज श्रेणीची एसयूव्ही असली तरी जर तुम्हाला त्याचे बेस मॉडेल खरेदी करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या किंमतीबद्दल सांगणार आहोत. बेस मॉडेल झेटा प्रो पेट्रोल मॅन्युअल आहे, जे मूलभूत फीचर्स तसेच लाइनअपमध्ये सर्वात कमी किंमत प्रदान करते.

जिम्नी झेटा प्रो पेट्रोल मॅन्युअल मॉडेलची किंमत 12.75 लाख रुपये (मॅन्युअल) आहे. यात 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे टॉप-स्पेक जिम्नी अल्फासारखेच आहे. जिम्नी झेटामध्ये स्टील व्हील्स, 7.0 इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, 6 एअरबॅग आणि ईएसपी सह इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. जिम्नी हे कंपनीचे प्रीमियम प्रॉडक्ट आहे. लाँच झाल्यापासून दर महा सुमारे 3,000 युनिट्सची विक्री होत आहे.

मारुती जिम्नी लेटेस्ट अपडेट्स

9 जून 2025 : मारुती जुमनीच्या फुल लोडेड अल्फा ट्रिमवर एप्रिल 2025 मध्ये 70,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळतो. लोअर स्पेक झेटा व्हेरियंटला या महिन्यात कोणतीही ऑफर मिळत नाही.

12 मे 2025: मारुती जिम्नी अल्फा व्हेरियंटवर मे 2025 मध्ये 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

04 फेब्रुवारी 2025 : जपानच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मेड इन इंडिया जिम्नी नोमेडने 50,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे.

30 जानेवारी : मेड इन इंडिया मारुती जिम्नी नोमाडे जपानमध्ये लाँच करण्यात आली आहे.

18 जानेवारी 2025 : ऑटो एक्स्पो 2025 मध्ये मारुतीने जिम्नीसाठी कॉन्करर कॉन्सेप्ट सादर केली.

मारुती सुझुकी जिमनी किंमत

मारुती जिमनीची किंमत 12.76 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 14.96 लाख रुपयांपर्यंत जाते. जिम्नी 6 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे – जिमनीचे बेस मॉडेल झेटा आणि टॉप मॉडेल मारुती जिम्नी अल्फा ड्युअल टोन एटी.