AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 किमी मायलेज, किंमत फक्त 3.70 लाख रुपये, ही कार बनली सर्वसामान्य लोकांची पहिली पसंत

सर्व सामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. 33 किमी मायलेज अन् किंमत फक्त 3.70 लाख रुपये. कारचे फीचर्स देखील आहेत खूपच जबरदस्त.

30 किमी मायलेज, किंमत फक्त 3.70 लाख रुपये, ही कार बनली सर्वसामान्य लोकांची पहिली पसंत
| Updated on: Aug 09, 2026 | 2:17 PM
Share

कमी बजेटमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Maruti Alto K10 हा सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो आहे. कमी किंमत, चांगले मायलेज, कॉम्पॅक्ट डिझाइन, सहज ड्रायव्हिंग आणि कमी मेंटेनन्स खर्च यामुळे ही कार एंट्री-लेव्हल कारच्या ग्राहकांमध्ये विशेष पसंतीची ठरली आहे.

विशेषतः छोट्या कुटुंबासाठी आणि दररोज मोठ्या प्रमाणात कार चालवणाऱ्यांसाठी Alto K10 चे S-CNG व्हेरिएंट फायदेशीर ठरू शकते. कंपनीच्या माहितीनुसार, CNG मॉडेल तब्बल 33.85 किमी मायलेज देऊ शकते. मात्र प्रत्यक्ष मायलेज हे रस्ता, वाहतूक, एसीचा वापर आणि ड्रायव्हिंगच्या पद्धतीनुसार बदलू शकते.

किंमत किती?

Alto K10 ची पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.69 लाख रुपये आहे. तर टॉप पेट्रोल AGS व्हेरिएंटची किंमत सुमारे 5.45 लाख रुपये आहे. CNG मॉडेलची किंमत सुमारे 4.95 लाख रुपयांपासून सुरू होते. CNG मध्ये LXi (O) CNG आणि VXi (O) CNG असे व्हेरिएंट उपलब्ध असून त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे सुमारे 4.81 लाख आणि 5.31 लाख रुपये आहे.

ऑन-रोड किंमत ठरवताना RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्कांचा समावेश झाल्याने अंतिम किंमत वाढते.

1.0-लिटर इंजिन आणि CNGचा पर्याय

Maruti Alto K10 मध्ये सुमारे 998cc क्षमतेचे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये मॅन्युअलसोबत AGS म्हणजेच ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. तर CNG मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

CNG मोडमध्ये पेट्रोलच्या तुलनेत इंजिनची कामगिरी थोडी कमी जाणवू शकते. मात्र दररोज ऑफिसला जाणे-येणे, शहरातील मोठ्या प्रमाणातील प्रवास किंवा महिन्याला जास्त किलोमीटर गाडी चालवणाऱ्यांसाठी CNG मॉडेल इंधन खर्चाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

फीचर्स आणि सेफ्टी

बजेट कार असूनही Alto K10 मध्ये दैनंदिन वापरासाठी आवश्यक अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. विविध व्हेरिएंटनुसार स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या सुविधा मिळतात. टॉप व्हेरिएंटमध्ये 17.78 सेंमी SmartPlay Studio देखील देण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS सोबत EBD आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स यांसारखी महत्त्वाची फीचर्स आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये पहिली कार खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी Alto K10 हा किफायतशीर आणि व्यावहारिक पर्याय ठरू शकतो.

Follow Us
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...