
सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने पुढील 10 वर्षांसाठी त्यांचा पॉवरट्रेन रोडमॅप तयार केला आहे. यामध्ये बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल(BEV), हायब्रिड आणि फ्लेक्स फ्युएल, इंटरनल कम्बशन इंजिन यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून नवीन वाहनं बाजारात उतरवण्यात येणार आहे. काळाची गरज पाहुन कंपनीने मोठा डाव टाकला आहे. कार्बन उत्सर्जनाच्या मोहीमेत कंपनी मोठे योगदान देण्यासाठी तयारी करत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील कारचे युग लवकरच मागे पडण्याची शक्यता आहे.
मल्टी पॉवरट्रेनचे धोरण
सुझुकीने मल्टी पॉवरट्रेन धोरण आखले आहे. पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांना नवीन पर्याय देण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. नवीन मॉडेल हे इंधन बचत आणि हायब्रिड इंजिनाची सरळमिसळ असतील. बायो फ्यूएल, ई-फ्युएल वाहनांचा ताफा लवकरच रस्त्यांवर दिसले. तर फ्लेक्स फ्युएलचा पर्याय पण ग्राहकांसाठी पुढ्यात असेल. यामुळे ग्राहकांसमोर अनेक पर्याय असतील. केवळ पेट्रोल-डिझेलवर त्यांची कार धावणार नाही. हायब्रिड पर्यायाकडे ग्राहकांचे अधिक लक्ष लागले आहे.
भारतासाठी फ्लेक्स फ्युएल योजना
मारुती सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 85% बायोएथेनॉलचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सक्षम फ्लेक्स-फ्यूल वाहन (FFV) बाजारात उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. एप्रिल 2025 रोजीपासून E20 बायोएथेनॉलवर धावणाऱ्या इंजिनाची चाचणी सुरू झाली आहे. लवकरच याविषयीचे मॉडेल बाजारात असेल.
भारतात हायब्रिड कारचे युग
सुझुकी 2026 मध्ये भारतात ई-विटारा इलेक्ट्रिक SUV आणि फ्रोंक्स हायब्रिड कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर लाँच करेल. फ्रोंक्स ब्रँडची ही पहिली हायब्रिड कार असेल. हा ब्रँड इन-हाऊस चाचणी करेल. नवीन हायब्रिड सिस्टिम टोयोटच्या एटकिंसन हायब्रिडच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि दणकट असेल. हायब्रिड पॉवरट्रेनचा वापर नवीन दमाच्या बलेनो, स्विफ्ट आणि ब्रिझा या कारमध्ये वापरण्यात येईल. यासर्व घडामोडींमुळे वाहन क्षेत्रात अनेक बदल दिसून येतील. कारमध्ये एकाप्रकारच्या इंधनाची गरज भासणार नाही. कार मध्येच कुठे बंद पडण्याची भीती राहणार नाही. काही वृत्तानुसार, लवकरच सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारचे प्रगत तंत्रज्ञान विकसीत होईल आणि येत्या काही वर्षात सौर ऊर्जेवर धावणाऱ्या कार बाजारात येतील. त्यांना पॉवर स्टेशनवर थांबण्याची गरज नसेल. त्या बाहेर उन्हातच चार्ज होतील. अर्थात त्यासाठी वाट पाहावी लागणार हे नक्की.