Aadhar Card : सरकारचे खास गिफ्ट; मुलांचे आधार बायोमॅट्रिक अपडेट एकदम फ्री
UIDAI ने मुलांसाठी अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. ही सुविधा एक वर्षांपर्यंत लागू असेल. यामुळे 5-17 वर्षांच्या देशातील जवळपास 6 कोटी मुलांना फायदा होईल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) शनिवार एक गिफ्ट दिले. UIDAI ने मुलांसाठी अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. ही सुविधा एक वर्षांपर्यंत लागू असेल. यामुळे 5-17 वर्षांच्या देशातील जवळपास 6 कोटी मुलांना फायदा होईल. हा नवीन नियम या 1 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू झाला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क मोजावे लागते. ते या निर्णयामुळे एक वर्षासाठी माफ झाले आहे.
UIDAI नुसार या निर्णयामुळे जवळपास 6 कोटी मुलांना फायदा होईल. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे आधार तयार करण्यासाठी त्यांचा फोटो, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म दाखला गरजेचा असतो. या मुलांचे फिंगरप्रिंट आणि आयरिस बायोमेट्रिक घेण्यात येत नाही. कारण ते पूर्णपणे विकसीत झालेले नसते. नवीन नियमानुसार, 5 वर्षांनंतर मुलांचे फिंगरप्रिंट,आयरिस आणि फोटो आधारमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे.
बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क नाही
5 वर्षांखालील मुलांचा फोटो, नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि जन्म दाखला देून आधारसाठी अर्ज करता येतो. आता त्यांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मुलांची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर पहिले अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे.
तर दुसरे अपडेट 15-17 व्या वर्षी पूर्ण करणे आवश्यक आहे. अगोदर 5-7 वर्षे आणि 15-17 वर्षांच्या मुलांसाठी अपडेट मोफत असेल. पण इतर अपडेसाठी प्रति MBU 125 रुपयांचे शुल्क द्यावे लागत होते. आता UIDAI ने 5-17 वर्षातील सर्व मुलांसाठी MBU ची प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. म्हणजे आता आई-वडिलांना मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. आधार अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन यामुळे मिळेल. देशातील अनेक कुटुंबांना याचा फायदा होईल.
आधार बायोमेट्रिक्स पूर्ण करण्याचे आवाहन
UIDAI ने आता मुलांचे आधार बायोमेट्रिक्स अपडेट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुलांना विविध सरकारी आणि शिक्षण खात्याशी निगडीत योजनांचा लाभ घेता येईल. शाळेत प्रवेशापासून ते शिष्यवृत्ती आणि डीबीटी योजनांचा सुविधा घेता येईल. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
