मारुतीचा धमाका; केवळ 5 हजारांत बुक करा विटारा ब्रेझा!

आगामी जून महिन्यात कंपनीकडून अधिकृत स्वरुपात घोषणा केली जाईल. दरम्यान, एरिना डीलरशिपने (Arena Delearship) नवी एसयूव्ही साठी बॅक डोअर बुकिंगला सुरुवात केली आहे.

मारुतीचा धमाका; केवळ 5 हजारांत बुक करा विटारा ब्रेझा!
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:46 AM

नवी दिल्ली- आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझूकीने (Maruti Suzuki) ग्राहकांसाठी नवी ऑफर लाँच केली आहे. विटारा ब्रेझा भारतात मिळणारी लोकप्रिय 5 सीटर एसयूवी आहे. मारुती सुझूकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणना केली जाते. कंपनी लवकरच विटेरा ब्रेझाचे अपडेटेड वर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आगामी जून महिन्यात कंपनीकडून अधिकृत स्वरुपात घोषणा केली जाईल. दरम्यान, एरिना डीलरशिपने (Arena Delearship) नवी एसयूव्ही साठी बॅक डोअर बुकिंगला सुरुवात केली आहे. किमान पाच हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग शक्य ठरणार आहे. नवीन जनरेशन नेक्स्ट ब्रेझा मॉडेलमध्ये महत्वाचे बदल असणार आहेत. नेक्स्ट जनरेशन विटेरा ब्रेझा आपल्या नावातून ‘विटेरा’ (Vitera) हटविण्याची शक्यता आहे. नव्याने लाँच होणाऱ्या ब्रेझाचे स्लीक डिझाईन, शार्प लूक हेडलॅम्प आणि टेललाईट्स असतील.

2022 मारुती ब्रेझाचे इंटेरिअर व एक्स्टेरिअर

2022 मारुती ब्रेझाचे इंटेरिअर पूर्णपणे नव्या डिझाईनचे असेल. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन डॅशबोर्ड, फ्री-स्टँडिंग टचसक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, मल्टी फंक्शनल स्टीअरिंग व्हील सारखे फीचर्स असणार आहे. नेक्स्ट जनरेशन ब्रेझा कारमध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, आरामदायी फ्रंट सीट, पॅडल शिफ्टर्स, सहा एअरबॅग्स, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, सुझूकी कनेक्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत. नवीन वर्जन सध्याच्या वर्जनच्या तुलनेत अधिक प्रगत असण्याची शक्यता आहे. कंपनी या कारच्या इंजिनमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देत बदल देखील करू शकते, ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड AMT गिअरबॉक्स दिले जाऊ शकते.

किंमतीची रेंज

मारुती विटेरा ब्रेझाच्या किंमती 7.84 लाखापासून 11.49 लाख रुपयांपर्यंत आहे. आगामी ब्रेझाच्या किंमती याहून अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय वाहन बाजारात टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाईट, किआ सॉनेट यांच्यासोबत स्पर्धा करावी लागणार आहे.

 रोड क्वीन

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही भारतामधील प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या देशात वापरल्या जाणाऱ्या 45 टक्के गाड्या मारुतीने बनवल्या आहेत. 1981  साली मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावने स्थापन करण्यात आलेली ही कंपनी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी भारतामधील पहिली कंपनी होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.