‘मारुती सुझुकी’ कार खरेदी सुलभ, कंपनीकडून ग्राहकांसाठी कर्ज सुविधा

अनिश बेंद्रे

|

Updated on: Dec 10, 2020 | 9:09 AM

वाहनासंबंधी सर्व आर्थिक गरजा भागवण्यासाठी मारुती सुझुकीने ऑनलाईन 'वन स्टॉप शॉप' सेवा सुरु केली आहे

'मारुती सुझुकी' कार खरेदी सुलभ, कंपनीकडून ग्राहकांसाठी कर्ज सुविधा
मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम
Follow us

नवी मुंबई : भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India) बुधवारी ‘स्मार्ट फायनान्स’ (Smart Finance) सेवा सुरु केली. कार खरेदीदारांसाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने कंपनीने ही सुविधा सुरु केली आहे. कोरोनाच्या संकट काळात मारुती सुझुकी कंपनीने पुन्हा एकदा कार खरेदी प्रक्रिया सोपी केली आहे. (Maruti Suzuki India launches Smart Finance Car Loan)

वन स्टॉप शॉप

ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या वाहनासंबंधी सर्व आर्थिक गरजा भागवण्यासाठी ‘वन स्टॉप शॉप’ सेवा ठरेल, असा विश्वास मारुती सुझुकीने व्यक्त केला आहे. ही सेवा आपल्याला योग्य फायनान्स पार्टनर निवडण्यास मदत करेल. आपण फक्त काही क्लिक्समध्ये सर्वोत्तम कर्ज सुविधा, वित्तीय कार्य, कर्ज आणि इतर प्रक्रिया पूर्ण कराल, असेही मारुती सुझुकीतर्फे सांगण्यात आले.

या व्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या कार कर्जासाठी एकापेक्षा जास्त योजनांची तुलना करण्याची, फायनान्स पार्टनर, कर्जाची मुदत निवडण्यासाठी कंपनीने सध्या आठ फायनान्सर्सबरोबर भागीदारी केली आहे. सध्या, ही सेवा नेक्सा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, परंतु अरेना ग्राहकांसाठी ही सेवा लवकरच सुरु केली जाईल.

कार खरेदी ट्रेंड भयावह नाही

कोरोनाचा कालावधी पाहता सणासुदीनंतरही वाहनांची विक्री जितका आपण विचार केला, तितकीशी वाईट झाली नाही, असं कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले. वाहन उद्योगाला बुकिंग आणि चौकशीच्या बाबतीत ग्राहकांच्या ट्रेंडमध्ये बदल दिसत आहे. मात्र ही घसरण किरकोळ आहे आणि वाहन उद्योगाने व्यक्त केलेल्या शंकेइतकी भीतीदायक नाही, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

मारुतीचा अनोखा विक्रम

मारुती सुझुकी इंडियाने गेल्याच महिन्यात एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने त्यांच्या ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक कार्सची विक्री केली. कंपनीने दोन वर्षांपूर्वी या ऑनलाईन चॅनेलची सुरुवात केली होती. याद्वारे कंपनीने आतापर्यंत संपूर्ण देशात 1000 डिलरशिप्स सुरु केल्या आहेत.

भारतातील 95 टक्के ग्राहक वाहन खरेदी करण्यापूर्वी ऑनलाईन माहिती घेतात. वेगवेगळ्या गाड्यांच्या किंमती आणि फिचर्सची तुलना करुन पाहतात. त्यानंतर कोणते वाहन खरेदी करायचे ते ठरवतात. ऑनलाईन माहिती घेतल्यानंतर ग्राहक विश्वासू डीलरकडे जातात आणि त्यानंतरच वाहन खरेदीबाबतची प्रक्रिया सुरु होते.

संबंधित बातम्या :

Nissan च्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या पाच दिवसात 5000 बुकिंग्सचा टप्पा पार

भारतीयांच्या मनात भरलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

(Maruti Suzuki India launches Smart Finance Car Loan)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI