भारतीयांच्या मनात भरलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

भारतात 2016 मध्ये 'ही' कार लाँच केली होती, त्यादरम्यान कंपनीने ही कार ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टसाठी पाठवली होती. तेव्हा या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत केवळ एक स्टार रेटिंग मिळालं होतं.

भारतीयांच्या मनात भरलेली 'ही' कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

केप टाऊन : भारतीयांच्या पसंतीस उतरलेली Renault ची Kwid ही हॅचबॅक कार पुन्हा एकदा ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टसाठी पाठवण्यात आली होती. या कारच्या दक्षिण आफ्रिकेतील मॉडेलला क्रॅश टेस्टमध्ये केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. परंतु ही गाडी भारतात विकल्या जाणाऱ्या क्विडपेक्षा तुलनेने अधिक सुरक्षित आहे. दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या क्विडमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. या एअरबॅग्स चालक आणि चालकाशेजारी बसणाऱ्या व्यक्तीसाठी अधिक लाभदायक आहेत. परंतु चालकाची मान आणि छाती जास्त सुरक्षित नाहीत. लहान मुलांसाठी ही गाडी बिलकूल सुरक्षित नाही. कारण क्रॅश टेस्टदरम्यान गाडीत बसलेल्या लहान मुलाच्या डोक्याला मार लागला. (Renault Kwid scores 2 stars in Global NCAP crash test)

भारतात 2016 मध्ये ही कार जेव्हा लाँच केली होती, त्यादरम्यान कंपनीने ही कार ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टसाठी पाठवली होती. तेव्हा या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत केवळ एक स्टार रेटिंग मिळालं होतं. त्यानंतर कंपनीने या कारमध्ये काही बदलदेखील केले. कंपनीने या कारच्या ब्राझील व्हेरियंटमध्ये खूप चांगले बदल केले आहेत. त्यामुळे तिथे या कारला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. या कारच्या भारतातील व्हेरियंटला 1, दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिंयंटला 2 आणि ब्राझीलमधील व्हेरियंटला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

Renault KWID तं इंजिन

क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.० लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे.

KWID मधील फिचर्स

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टी फिचर्स

सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

(Renault Kwid scores 2 stars in Global NCAP crash test)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI